vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे!,जेष्ठ नाट्य – चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत ‘३७ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत’ पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची ‘पधारो म्हारे देस’ अव्वल!

रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे!,जेष्ठ नाट्य – चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत ‘३७ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत’ पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची ‘पधारो म्हारे देस’ अव्वल!

 

गुरुकुल द डे स्कूलच्या ऋग्वेद आमडेकर आणि डीएव्ही पब्लिक स्कुलच्या(नवीन पनवेल) दिक्षा शिलवंत यांना अभिनयाचे प्रथम पारितोषिक!

 

 मुंबई प्रतिनिधी

मुंबई: जेष्ठ नाट्य – चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत ‘रविकिरण मंडळाची ३७ व्या बालनाट्य स्पर्धा नुकतीच मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, संगीत, प्रकाश योजना तसेच अभिनय (मुलींमध्ये) तृतीय व अभिनय (मुलांमध्ये) उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावून हे बालनाट्य अव्वल ठरले. यासोबत द्वितीय क्रमांक सेक्रेड हार्ट, हायस्कुलच्या ‘को म की का’ या बालनाट्यास तर तृतीय पुरस्कार आर्टिस्ट प्लॅनेट, काळाचौकी शाळेच्या ‘जा रे जा, सारे जा’ पटकाविले. तसेच पहिले उत्तेजनार्थचे बक्षीस विलेपार्ले महिला संघ – मराठी माध्यम शाळेच्या ‘छोटा अंबानी’ या बालनाट्याला तर दुसरे उत्तेजनार्थ गुरुकुल द डे स्कूलच्या ‘अ-फेअर’ला देण्यात आले. या चुरशीच्या स्पर्धेत १७ बालनाट्यांचा समावेश होता, त्यातून हा अंतिम निकाल देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

सिंदखेडराजा बाजार समिती सचिवांच्या मालमत्तेचा ६ फेब्रुवारीला जाहीर लिलाव- जमीन महसूल थकबाकी वसुलीसाठी महसूल विभागाची कठोर कारवाई

vishwatmaklokswamivarta

परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा..

गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना आधार प्रमाणीकरण ई-केवायसी अनिवार्य*

vishwatmaklokswamivarta

बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन