
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना गतिमानता पंधरवडा मोहीम…
ठाणे, प्रतिनिधी- मा. विकास आयुक्त (उद्योग) श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दि. 17 डिसेबंर ते 30 डिसेंबर 2023 पर्यंत मुख्यमंत्री रोजगार योजना गतिमानता पंधरवडा घोषित केला आहे. हा पंधरवडा यशस्वी होण्यासाठी उद्योग संचालनालय आणि खादी व ग्रामोद्योग विभागाच्या अधिनस्त सर्व महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी/कर्मचारी यांनी केवळ मुख्यमंत्री रोजगार निमिर्ती योजनेचे काम करणेबाबत निर्देश देण्यात आले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) हा उद्योग विभाग, महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम असून, युवक युवतींना उद्योजक बनविण्यासाठी सक्षम करणारी आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देणारी योजना आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत, सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता संपूर्ण राज्यासाठी 30,000 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले असून अनुदान वाटपासाठी 541 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत कोकण विभागास 5000 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, अद्याप पर्यंत 1057 कर्जप्रकरणे मंजूर झाले असून त्याचे प्रमाण लक्षांकाच्या 19 टक्के आहे. त्यामुळे, श्री. दिपेंद्रसिंह कुशवाह, विकास आयुक्त (उद्योग) यांनी दि. 17 डिसेबंर ते 30 डिसेंबर 2023 पर्यंत मुख्यमंत्री रोजगार योजना गतिमानता पंधरवडा घोषित केला. यासाठी पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या होत्या- सर्व महाविदयालये, अभियांत्रिकी महाविद्यालयात तसेच शासकीय व खाजगी ITI, अशासकीय संस्था येथे योजनेचे जनजागृती मेळावे, प्रचार व प्रसिद्धी आयोजित करून पात्र लाभार्थ्याचे जागेवर अर्ज भरून घेण्याचे कार्यवाही करावी. हे अर्ज तात्काळ पोर्टलवर upload करणे. प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना जसे कि MCED, मिटकॉन, RSeti , skill development येथील तरुण-तरुणींची यादी घेऊन त्यांना या योजनेची माहिती द्यावी. महिला मेळावे घेणे ज्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, महिला बचत गट यांना संपर्क साधून महिलाना प्राधान्याने या योजनेत सहभागी होण्यासाठी कृती आराखडा तयार करून काम करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व महामंडळे आणि NGO यांना संपर्क साधून लाभार्थी योजनेत सहभागी करून घेणे. एक बँक – एक प्रकरण यासाठी सर्व. बँक मॅनेजर यांना संपर्क करून योजनेत सहभाग वाढविणे. एक गाव किमान एक प्रकरण या प्रमाणे काम करणे. एक जिल्हा एक वस्तू याप्रमाणे जिल्ह्यातील उद्योगांना प्राधान्य देणे. औद्योगिक समूह योजनेतील लाभार्थीना लाभ देणे. मासिक, त्रैमासिक बँकेच्या मिटिंगसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठका आयोजित करणे व विस्तृत पाठपुरावा/समन्वय करणे. बँकेत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करून घेणे.
बँकाकडे प्रलंबित प्रकरणाबरोबर लक्षांकाच्या दोन ते अडीच पट प्रकरणे बँकांना गतिमानता पंधरवडयात पाठविण्याची कार्यवाही पूर्ण करणे. डिसेंबर अखेरपर्यंत 50 टक्के मंजुरीचे उदिष्ट व 25 टक्के क्लेम सादर करण्याची कार्यवाही पूर्ण करणे निश्चित केलेली आहे.
सदर पंधरवडा यश
[05/01, 8:26 pm] Swamiji: सदर पंधरवडा यशस्वी होण्यासाठी राज्यभर विभागीय/जिल्हास्तरावर महाव्यवस्थापक व जिल्हा ग्रामोद्योग आधिकारी/कर्मचारी यांचेमार्फत तालुकानिहाय जनजागृती मेळावे, प्रचार व प्रसिध्दी करण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांचे जागेवर अर्ज भरुन घेण्यात आले. महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालयात तसेच शासकीय व खाजगी ITI , अशासकीय संस्था येथेही योजनेची व्यापक प्रमाणात माहिती देण्यात आली. याशिवाय MCED, मिटकॉन, RSeti, skill development येथील तरुण-तरुणींना योजनेची माहिती देण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, महिला बचत गट यांना संपर्क साधून महिलांना प्राधान्याने या योजनेत सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणी महिलांकरिता मेळावे घेण्यात आले. “एक बँक – एक प्रकरण” याकरिता बँकस्तरावर बैठका घेवून त्यांचाही सहभाग योजनेमध्ये घेण्यात आला. तसेच जिल्हापरिषद यांच्या सहकार्याने “एक गाव किमान एक प्रकरण” असेही मेळावे राबविण्यात आला. एकंदरीत, योजनेच्या गतिमानता पंधरवडया कालावधीत राज्यभर उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला. सर्व जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हया योजनेची प्रचार प्रसिध्दी करिता जिल्हयांतील सर्व महाविदयालये, अभियांत्रिकी महाविद्यालयात तसेच शासकीय व खाजगी ITI, अशासकीय संस्था येथे 100 पेक्षा जास्त ठिकाणी योजनेचे जनजागृती मेळावे घेण्यात आले, त्यामध्ये सुमारे 5000 पेक्षा जास्त अर्जदारांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. 3000 पेक्षा अधिक अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले असून, 168 कर्जप्रकरणांना मंजूरी प्राप्त झाली व 55 कर्जप्रकरणे मार्जीन मनी दावे सादर करण्यात आले.
राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना गतीमानता पंधरवडाचा लाभ सर्व नवउद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन श्रीमती विजू सिरसाठ, उद्योग सह संचालक, कोकण विभाग, ठाणे यांनी केले. तसेच बँकांकडे मंजूरीसाठी प्रलंबित असलेल्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करुन जास्तीत जास्त कर्जप्रकरणांना मंजुरी देण्याचे आवाहन श्रीमती विजू सिरसाठ, उद्योग सह संचालक, कोकण विभाग ठाणे यांनी सर्व बँकांना केले. जेणेकरुन या योजनेंतर्गत कोकण विभागातील जिल्हयांना देण्यात आलेले उद्दिष्टपूर्तता करणे शक्य होईल.
0000000000



