
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३दोन केंद्रांवर ५२८ उमेदवारांची व्यवस्था;२०,२१ व २२ रोजी परीक्षा
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवर दि.२०, रविवर दि.२१ व सोमवार दि.२२ रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दोन परीक्षा केंद्रांवर ५२८ उमेदवारांची परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेच्या कामकाजासाठी ७३ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली आहे.
परीक्षा केंद्र याप्रमाणे-
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स- २४० परीक्षार्थी.
२. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड सायन्स, सुभेदारी विश्रामगृहाजवळ, विश्वासनगर.- २८८
परीक्षार्थींसाठी सुचनाः-
परीक्षार्थींनी परीक्षेस येतांना ओळखीचा पुरावा (स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी कोणतेही एक) परीक्षा कक्षात उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉलपेन, ओळखपत्र, ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही. तसेच डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लू टूथ, कॅमेरा फोन अन्य तत्सम संदेशवाहक उपकरण, इलेक्र्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात नेण्यास मनाई आहे, असेही उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.
०००००
[12/01, 7:14 pm] Swamiji: ४४ वे वार्षिक पुष्पप्रदर्शन १० व ११ फेब्रुवारी रोजी; सहभागाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर,दि.१२ (जिमाका):- सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग उपवने व उद्याने यांच्या वतीने शनिवार दि.१० व रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी ४४ व्या विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन व उद्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत व प्रदर्शनात अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन सहायक संचालक जे. व्ही. चौगुले यांनी केले आहे.
या विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शनात गुलाबपुष्पे फुलदानातून, मोसमी फुले, बहुवार्षिय फुले, कॅक्टस व सकुलंट, कुंड्यातील शोभिवंत झाडे, लॅण्डस्केप ऑन द स्पॉट, कलात्मक पुष्परचना, उद्यान स्पर्धा इ. विभाग आहेत. प्रत्येक विभागातील विजेत्यास एक चषक, पुष्पप्रदर्शनात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या स्पर्धकास उपवने व उद्याने विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी पुरस्कृत केलेला फिरता चषक प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेतील व सर्व गटांकरता वेगवेगळी परितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच पुष्परचना, पुष्प रांगोळी या विभागासाठीही पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
प्रवेशिका सादर करण्याचे वेळापत्रक याप्रमाणे-
पुष्प प्रदर्शन स्पर्धेसाठी प्रवेशपत्रिका देणे व स्विकारणे दि.२५ जानेवारी ते ९ फेब्रुवारी पर्यंत कार्यालयीन वेळेत.
उद्यान स्पर्धेसाठी प्रवेशपत्रिका देणे व स्विकारणे दि.२५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी पर्यंत कार्यालयीन वेळेत.
उद्यानस्पर्धा हा उद्यानाचा प्रकार, आकार (क्षेत्रफळ) अशा वेगवेगळ्या गटात असून स्पर्धेत सहभागी झालेल्या उद्यानांचे परीक्षण दि.६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान होईल.
प्रवेशिका स्विकारण्याचे ठिकाण- सहाय्यक संचालक, उपवने व उद्याने यांचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मध्यवर्ती इमारत (विस्तार), अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर.
अधिक माहितीसाठी सहायक संचालक जे. व्ही. चौगुले ८६९८०७०८८२, उद्यान अधीक्षक एस.टी. जाधव ९१७२५५९७९८, एस.टी. काळे ९४२१३०७५७५ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.



