vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

शांतपणाने केवळ अलिप्त व्हा!

शांतपणाने केवळ अलिप्त व्हा!

अध्यात्मिक वार्ता

ताज्या फुलांचे आपल्याला कोण कौतुक असते. आणि ती देवाच्या पायांवर वाहिली की आणखी आनंद होतो. फुले घेताना ती ‘माझी’ असतात. पण देवाला वाहिली की ‘त्याची’ होतात…… किती शांतपणे आपण हे स्वीकारतो. अगदी अलिप्त होतो….. ‘ज्याचे होते त्याला दिले’ … फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते.

काल वाहिलेली फुले आज शिळी होतात. निर्माल्य होऊन जातात. मग निरिच्छ मनाने, ती उचलून आपण गंगार्पण करतो……. त्यांच्याप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो. अपेक्षा नसते. हे कसे सोडू? हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही.

अगदी तसेच, आपली दु:खे ‘त्याच्या’ चरणावर वहायची आणि शांत होऊन जायचे….

त्यांच्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही…….. आतापर्यंत जी ‘माझी’ दु:खे होती. ती आता ‘त्याची’ झाली. त्यांचा कसला विचार करायचा….. आणि कालची दु:खे तर, आज निर्माल्य झाली. त्यांचा मोह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो.

शिळ्या फुलांप्रमाणे, मग ती सडायला लागतात. आणि मग मनाला पोखरायला लागतात…. म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत, तोपर्यंतच गंगार्पण करून मोकळे व्हायचे.

आज पेरण्यासाठी आपण आनंद आणू ना. धान्याची पेरणी करताना, जशी जमिनीची मशागत करतात…..

तशी मनाची साफ-सफाई करु…. आणि तिथे आनंद पेरुया. तो शतपटीने उगवून येतो…. त्याची जोपासना करु….. त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो. म्हणूनच …..

 

दु:ख सोडून दयावे,… निर्माल्य बनून जाते.

आनंद पेरत जावा,…. समाधान बनून रहाते.

: पारखून घेतले तर कोणीच आपले नसते .संमजून घेतले तर कोणीच परके नसते.माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की, बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात.दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले कि आनंदाची फुले आपल्या दारात पडतात

संबंधित पोस्ट

श्री गणेश जीवन परिचय* गणपती बाप्पा मोरया

vishwatmaklokswamivarta

सोन्नलगी ‘ आजचे सोलापूर शहर , म्हणजे आमचं शहर. या शहरात कोणी ही उपाशी पोटी झोपत नाही अशी या शहराची महिमा आणि अनुभव आहे. याला कारण म्हणजे हे शहर ज्यानीं वसवले ते येथील आमचे ग्रामदैवत श्री. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज !!

vishwatmaklokswamivarta

मानव जीवन कल्याण होण्या साठी. आणि आपले दुःख दूर होण्यासाठी जप तप करणे आवश्यक आहे* – काशी जगद्गुरू 

वास्तुशांती का करावी…?

शिवलिंगाची उत्पत्ती*

वीरशैव मराठी संतपरंपरेचे सर्वोच्च शिखर ः संत मन्मथ माऊली ||* 

vishwatmaklokswamivarta