
पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन, क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टच्या उड्डाणास पोलीस आयुक्तालय हद्दीत बंदी..
ठाणे, प्रतिनिधी : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व मानवी जीवनाच्या सुरक्षिततेला व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ नये, यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पूर्वपरवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रित क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास दि.14 जानेवारी 2024 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते 13 मार्च 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत या 60 दिवसांच्या कालावधीत बंदी घालण्यात आली असल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.
त्यांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रित क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास 60 दिवसांसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट ड्रोनद्वारे हवाई निगराणी करण्यास ठाणे शहर पोलिसांना परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही या आदेशात नमूद केले आहे.
000000



