vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर एसटी महामंडळाचा आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक निर्णय,

एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर एसटी महामंडळाचा आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक निर्णय
मुंबई प्रतिनिधी : एसटीचं विलिनीकरण, पगारवाढ यासाह अनेक मुद्द्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटीचा संप सुरू आहे. राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने 41 टक्क्यांची पगारवाढ दिल्यानंतर काही ठिकाणी कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटीचं विलिनीकरण करावं या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.

एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता धक्कादायक बातमी आहे. पहिल्या टप्प्यात निलंबित झालेल्या सुमारे 3 हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळ बडतर्फीची नोटीस बजावणार असल्याची माहिती मिळाली आहे.

निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी महामंडळाने 14 दिवसाची मुदत दिली होती. या मुदतीमध्ये काही कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. तर काही कर्मचाऱ्यांनी या नोटीस इकडे दुर्लक्ष केलं आहे .

या सर्व कर्मचाऱ्यांचे बाबतीत पुढील कारवाई म्हणून महामंडळ त्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलं नाही आणि दुर्लक्ष केलं त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

वरिष्ठ कार्यालयाकडून स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार आता बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना हा मोठा धक्का आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा सेवा सेवाप्रवेशोत्तर परीक्षा २०२४ साठी आवेदन पत्रे जिल्हा परिषदेकडून प्राप्त करा !आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी       

भारताची चांद्रयान-3 मोहीम सुरू होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची बहुप्रतिक्षित मोहीम शुक्रवारी प्रक्षेपणासाठी सज्ज

राज्यामध्ये प्रती आणि समृद्धी सरकार –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी आपला अन्नदाता, आपला मायबाप ; बियाणे अतिशय उत्कृष्ट प्रतीची हवीत

राज्यातील 100 महाविद्यालयांमध्ये4 मार्चपासून कौशल्य विकास केंद्र महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला ऑन दि स्पॉट तक्रारीचा निपटारा..

मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी 52 हजार कोटीची तरतूद- उद्योगमंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta