vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज प्रकरणांना तातडीने मंजूरी द्या अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा  -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज प्रकरणांना तातडीने मंजूरी द्या अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा  -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

 

ठाणे, प्रतिनिधी :- बँकांनी गरजू आणि पात्र लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे प्रलंबित न ठेवता त्या प्रकरणांना तातडीने मंजूरी देण्याची भूमिका स्विकारावी. यापुढे ज्या बँका जिल्हा प्रशासन आणि पात्र लाभार्थ्यांना सकारात्मक प्रतिसाद देणार नाहीत, त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अशा कडक शब्दात जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी बँक अधिकाऱ्यांना तंबी दिली.

 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डी. एल. सी. सी. व डी. एल. आर. सी. ची बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

 

या बैठकीस जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री.नागेंद्र मंचाल, रिझर्व बँकेचे अधिकारी श्री.अरुण बाबू , नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक श्री.सुशांत कुमार, उद्योग ‍विभाग कोकण विभागाच्या सहसंचालक श्रीमती विजू शिरसाठ, तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे मुख्याधिकारी शिवाय काही खाजगी बँकांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप पीक कर्जाचे वाटप व रब्बी पीक कर्जाचे वाटप एकूण पीक कर्जामध्ये दिलेल्या उद्दिष्टापैकी 76 टक्के उद्दिष्ट 31 डिसेंबर 2023 पर्यंत बँकांनी पूर्ण केलेले आहे, उरलेले उद्दिष्ट 28 फेब्रुवारी 2024 पूर्वी पूर्ण करावे, सर्व बँकांनी प्राथमिकता क्षेत्रातील कर्ज वाटप वाढवावे, पीएम स्वनिधी चे ठाणे जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेंतर्गत बँकांनी उद्दिष्ट पूर्तीसाठी विशेष प्रयत्न करावेत व जास्तीत जास्त अर्जदारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हातभार लावावा, दिलेले उद्दिष्ट फेब्रुवारी 2024 या महिनाअखेर पूर्ण करावे, जन मन योजनेंतर्गत कातकरी समाजाच्या जास्तीत जास्त लोकांची जनधन खाती उघडावीत, शिवाय पात्र कातकरी बांधवांना केसीसी कर्ज द्यावे, जिल्हा प्रशासनाने बँकांकडे मागितलेली माहिती वेळच्या वेळी द्यावी, असे स्पष्ट निर्देश उपस्थित बँक अधिकाऱ्यांना दिले.

 

यावेळी नाबार्डचे अधिकारी श्री.सुशांत कुमार यांनी पोटेन्शिअल लिंक क्रेडिट प्लॅन 2024-25 पुस्तकाचे जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सोशल नेटवर्क वर कर्जमाफीसंदर्भात खोटे संदेश पाठविले जात आहेत, त्या संदर्भात सर्वांनी सावधानता बाळगावी व अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले.

 

बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या निर्देशांचे सर्व बँका काटेकोर पालन करतील, असे आश्वासित करुन उपस्थित सर्वांचे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री.नागेंद्र मंचाल यांनी आभार मानले.

 

0000000000

संबंधित पोस्ट

विमान अपघातातील प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष*

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ : तृतीय दिवस !काशी विश्वेश्वर मंदिर मुक्तीसाठी लढा देणारे अधिवक्ते आणि याचिकाकर्ते यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनात सत्कार !

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते दाखले वितरण

जय शिवाजी, जय भवानी”च्या जयघोषाने दुमदुमले गडचिरोली!*जय छत्रपती शिवाजी – जय भारत पदयात्रा उत्साहात संपन्न”शिवरायांचे विचार अंगीकारून व्यक्तिमत्त्व घडवा” – जिल्हाधिकारी एकता पार्क चे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-:हातमाग व विणकारांच्या विकासासाठी शासनाचे प्रयत्न

vishwatmaklokswamivarta

उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबविणार-उद्योग मंत्री उदय सामंत*मोझरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार