vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

निवडणूक प्रक्रिया राबवितांना सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक- जी. श्रीकांत

निवडणूक प्रक्रिया राबवितांना सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक- जी. श्रीकांत

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- निवडणूक प्रक्रिया राबवितांना सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने सर्व प्रक्रियांसाठी नियमावली व सुचना दिल्या आहेत, त्यांचे काटेकोर पालन करावे व समन्वय राखून कामकाज करावे,असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज येथे दिले.

 

जिल्हा नियोजन सभागृहात आज जी. श्रीकांत यांनी निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यात मतदान यंत्रे व त्यांच्यासाठी राखावयाच्या सुरक्षा उपाययोजना याविषयी उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी सादरीकरण करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. विधानसभा मतदारसंघनिहाय पोलीस अधिकारी व निवडणूक कर्मचारी यांचा समन्वय राखला जावा. ज्या ठिकाणीमतदार यंत्रे ठेवलेली आहेत तेथील सुरक्षा उपाययोजनांची चाचणी करावी. तेथील पाहणी करावी. तसेच मतदारसंघनिहाय संवेदनशील मतदान केंद्र इ. ची नोंदणी करावी, असे निर्देश जी. श्रीकांत यांनी दिले. बैठकीस जिल्ह्यातील तहसिलदार, पोलीस दलातील अधिकारी आदी उपस्थित होते.

 

००००००

संबंधित पोस्ट

190-उरण व 191 पेण विधानसभा मतदार संघासाठी.संतोष कुमार राय यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती.

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहाेचवा – राज्यमंत्री योगेश कदम कणकवली मतदारसंघातील विविध विभागांची आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

पंजाब चे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशामध्ये  राजकीय लढाई हरले, पण त्यांचा मुलगा ही निवडणूक जिंकला

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘लातूर जिल्हा : वाटचाल प्रगतीकडे’ या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

शेतकरी शिधापत्रिकाधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम मिळणार

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील