
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशामध्ये राजकीय लढाई हरले, पण त्यांचा मुलगा ही निवडणूक जिंकला
पंजाब प्रतिनिधी
पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात घमासान सुरु आहे. याची अखेर अमरिंदर यांचा राजीनामा घेण्यात झाला आहे. वडील अमरिंदर भलेही राजकीय युद्ध हरले असतील तरी त्यांचा मुलगा रनिंदर सिंग हे चौथ्यांदा भारतीय राष्ट्रीय रायफल संघ (एनआरएआय) चे अध्यक्षपद जिंकले आहे. त्यांनी बसपा खासदार श्याम सिंह यादव यांना तब्बल 56-3 एवढ्या मतफरकाने हरविले आहे.
एनआरएआयच्या 59 सदस्यांनी अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला होता. यामध्ये रनिंदर यांना 56 मते मिळाली. यादव हे उत्तर प्रदेश रायफल संघाचे अध्यक्ष आहेत. एनआरएआय निवडणुकीविरोधात दिल्ली उच्चन्यायालयात यादव यांनी याचिका दाखल केली होती. यानंतर क्रीडा मंत्रालयाने पन्हा नवीन निवडणूक प्रक्रिया सुरु करावी असे निर्देश दिले होते. परंतू तरीही तीन निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यादव हे उत्तर प्रदेशच्या जौनपूर लोकसभा मतदारसंघातून बसपाचे खासदार आहेत.
पंजाबमध्ये काय घडतेय…मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशामध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील छत्तीसचा आकडा, त्यातून दोघांचे झालेले गट, वाढलेली गटबाजी आणि त्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता व असंतोष यांचा स्फोट होत आहे, हे लक्षात येताच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याचे आदेश शनिवारी दिले. त्यामुळे सिंग यांनी पद सोडले खरे, तर तसे करताना थेट बंडाचीच भाषा केली.



