vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मोठ्या पोलीस बंदोबस्तात लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ.

 मोठ्या पोलीस बंदोबस्तात लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ…

मुंबई प्रतिनिधी : गणेशोस्तवाचे 10 दिवस बघता बघता निघून गेले. गणेशभक्तांनी गणेश चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं. तर आज बाप्पाला निरोप द्यायचा दिवसंही उजाडला आहे. राज्यात अनेक ठिकाणी गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. तर मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’चा विसर्जन सोहळा सुरु झाला आहे.

दरम्यान लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे निघाला आहे. लाडक्या लालबागच्या राजाची एक एक झलक पाहण्यासाठी आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामील होऊ नये, असं आवाहन लालबागच्या राजाच्या मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी केलं होतं.

दुसरीकडे मुंबईचा राजा मानला जाणारा गणेशगल्लीचा बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेनं रवाना झालाय. या सोहळ्यात नागरिकांची गर्दी होऊ नये असं सतत आवाहन करण्यात येतंय.

तर पुण्यामध्ये मानाच्या दोन गणपतींचं विसर्जन करण्यात आलं आहे. पुणेकरांचं ग्रामदैवत पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचे पर्यावरण पूरक हौदात विसर्जन करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन मंडळातच केलं जाणार आहे.

संबंधित पोस्ट

आजच आपले नाव शोधा..आणि मतदानाचा पवित्र हक्क बजावा…!    -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली

नवरात्रोत्सवात हे 3 दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट..

vishwatmaklokswamivarta

भांडुप मध्ये आरके विधीमहाविद्यालयाचे उद्या उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले ; खासदार उज्ज्वल निकम उपस्थित राहणार

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून सहकारसंदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा निर्णय कारागृहातील वाचनसंस्कृतीस चालना; बंदिवानांसाठी वाचनाची नवी संधी