
आजच आपले नाव शोधा..आणि मतदानाचा पवित्र हक्क बजावा…! -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
राज्य प्रतिनिधी सोमवारी 20 मे 2024 रोजी मतदान होत आहे. मतदानाला जाण्यापूर्वी प्रत्येक मतदाराने आपले नाव कोणत्या केंद्रावर आहे, मतदान केंद्र कोठे आहे, याची माहिती आजच जाणून घ्या. यासाठी टोल फ्री क्रमांक 1950 किंवा मा. भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या voter helpline app तसेच www.eci.gov.in या वेबसाईटवर आपले नाव आपण पाहू शकाल व मतदान केंद्रावर जाणे सोईचे होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी सर्व नागरिकांना केले आहे.
निवडणुकीमध्ये मतदारांचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक विभागाच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यांपासून स्वीपच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले गेले असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. स्वीपच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीला नागरिकांचा सहभाग देखील मिळाला असून मी मतदान करणार… आपणही मतदान करा… ! असा जनजागृतीचा संदेशही स्वीपच्या पथकांमार्फत देण्यात आला आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी सोमवार, दि.20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून नागरिकांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन केले आहे.
00000000000
वृ.क्र.442/2024



