vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महागाईचा मोठा भडका; चक्क कोथिंबीर 400 रुपये किलो

 महागाईचा मोठा भडका; चक्क कोथिंबीर 400 रुपये किलो

[ मुंबई प्रतिनिधी  : पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार गेल्यानंतर महागाईचा चांगलाच भडका उडताना दिसत आहे. राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर नागपुरात मिळत आहे. सध्या भाज्यांबरोबर कोथिंबीरची आवक कमी झाली आहे. त्यात इंधन दरवाढ यामुळे कोथिंबीरची किंमत अव्वाच्यासव्वा वाढलेली दिसून येत आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीर 400 रुपये किलोने विकली जात आहे. ( Rs 400 per kg of cilantro ) तर कोथिंबीरची जुडी 100 ते 120 रुपये दराने विकली जात आहे.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात नवी आवक सुरू होताच कोथिंबीर दरात घट होईल, अशी शक्यता वर्तवली गेली आहे. भाज्यांच्या किंमतीही भडकल्या आहेत. आता तर कोथिंबीरने भडका उडवला आहे. त्यामुळे शहरात कोथिंबीर सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेर गेली आहे. ठोक बाजारात 250 ते 300 रुपये किलोने कोथिंबीर खरेदी केली जात आहे. तर किरकोळ बाजारात कोथिंबीर 400 रुपये किलोवर गेली आहे.

राज्यात सध्या लांबलेल्या पावसाने स्थानिक पिकांना चांगले झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोथिंबीर जागेवरच खराब झाली आहे. परिणामी, सध्या कोथिंबीरचा तुटवडा जाणवत आहे. एकीकडे पेट्रोल, डिझलचे दर गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे घरगुती सिलिंडर 920 रुयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आता भाजीपाल्यानेही नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे महागाईचा कहर पाहायला मिळत आहे.

नागपुरात कधी नव्हे  इतकी कोथिंबीर  महाग  झाली आहे. 40 रुपयांची कोथिंबीरची पेंडी 100 रुपयांच्यावर गेली आहे. सध्या मध्यप्रदेश, छिंदवाडा, नांदेड येथून कोथिंबीरची आवक नागपुरात होत आहे. मालवाहतुकीचे दर वाढल्याने देखील कोथिंबीरच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

संबंधित पोस्ट

शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती सर्व विभागांनी संकेतस्थळांवर उपलब्ध करुन द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार

2030 पर्यंत ठाणे जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सेवा संस्था तयार करणार नवीन रोड मॅप.

अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे निर्देश..

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात माध्यमांना बंदी…

मुंबई मध्ये पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचे ट्वीट; आरोपीचा शोध सुरू  मुंबई पोलीस