vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकठळक बातम्या

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराज महावारसा या नवीन पुरस्काराची घोषणा

मुंबई, प्रतिनिधी : साठच्या दशकात महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांचा भव्यदिव्य सोहळ्यात यथोचित सन्मान करत वाटचाल सुरू करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे होणार आहे.

राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, २०२४ चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याचबरोबर २०२४ चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला जाणार आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव या पुरस्काराने करण्यात येणार आहे. याशिवाय, ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारही यावेळी प्रदान केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची परंपरा पुढे नेणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवी वाटचालीनिमित्त खास स्मरणिकाही यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे.

गेली ६० वर्षांहून अधिक काळ सातत्याने मराठी चित्रपटकर्मींचा सन्मान करणारा हा पुरस्कार सोहळा एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. केवळ मनोरंजन क्षेत्रासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातही हा हीरक महोत्सवी क्षणसोहळा अनोखा ठरणार असल्याचे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे – पाटील यांनी सांगितले.

 या कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका रवींद्र नाट्य मंदिर, शिवाजी मंदिर, साहित्य संघ, दीनानाथ नाट्यगृह, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे विनामूल्य उपलब्ध असतील.

000

 

संबंधित पोस्ट

पायाभूत सोई सुविधांनी समृद्ध महाराष्ट्र निर्माण करणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपीदुरुस्ती व देखभालकरिता नवीन धोरण आणणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या, स्वच्छतागृह आदींच्या सद्यस्थितीचा अहवाल सात दिवसात द्या – पालकमंत्री पंकजा मुंडे- शाळा दुरुस्तीचा निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश- आदर्श शाळा, आधुनिक ग्रंथालये आणि रेशीम ब्रँडिंगसाठी कालबद्ध आराखडा तयार करा

vishwatmaklokswamivarta

डिजिटल युगातील बदलांशी शिक्षकांनी अद्ययावत राहावे -पालकमंत्री जयकुमार रावल तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण व कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुणवत्तावाढीसाठी प्रभावी वापर करा

vishwatmaklokswamivarta

शेवटच्या घटकाचा विचार हाच खरा न्याय – न्यायमूर्ती अनिल किलोर बल्लारपूर येथे दिवाणी न्यायालय नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta