मुंबई मध्ये पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचे ट्वीट; आरोपीचा शोध सुरू मुंबई पोलीस
मुंबई प्रतिनिधी
मुंबई मध्ये पुन्हा ब्लास्ट घडवून आणाण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. कॉल्स प्रमाणेच आता ट्वीटर मेसेजवर ही धमकी देण्यात आली आहे.
मुंबई मध्ये काल 22 मे च्या रात्री पोलिसांना ट्वीवर वरून बॉम्ब ब्लास्टच्या धमकीचे मेसेज आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान ‘मुंबई मध्ये लवकरच स्फोट घडवून आणणार’ असं त्यामध्ये सांगण्यात आलं आहे. या धमकीच्या मेसेज नंतर आता मुंबई पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मागील काही महिन्यात अशाप्रकारे पोलिसांना धमकीचे फोन करून खळबळ निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत.