
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार . ९ जुलै किंवा १० जुलै होणार असल्याची शक्यता असल्याची सूत्राची माहिती
मुंबई प्रतिनिधी
गेल्या वर्षभरापासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. शिंदे गटातील आणि भाजपचे अनेक आमदार मंत्रिपदाकडे आस लावून बसले आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे ९ आमदार या महायुतीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक आमदारांच्या मंत्रीपदाला कात्री लागण्याची शक्यता आहे
सत्ताधाऱ्यांकडूनही वारंवार मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या आठवड्यात विस्तार होईल असं सांगितलं जात असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केलं आणि सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे त्यांच्यासह 8 सहकाऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तर आता भाजप-शिवसेना- अजित पवार गट यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे
मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत काल रात्री मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची नंदनवन या शासकिय निवासस्थानी बैठक झाली आहे. उर्वरित मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजप व शिवसेनेच्याच आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.



