vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना शहरात 13 फेब्रुवारीपासून भव्य महासंस्कृती महोत्सव प्रसिध्द कलावंत सादर करणार सांस्कृतिक व मनोरंजक कार्यक्रम केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार

जालना शहरात 13 फेब्रुवारीपासून भव्य महासंस्कृती महोत्सव प्रसिध्द कलावंत सादर करणार सांस्कृतिक व मनोरंजक कार्यक्रम केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार महोत्सवाचे उदघाटन

 

जालना, प्रतिनिधी :- महासंस्कृती महोत्सवासाठी जालना नगरी सज्ज झाली आहे. या महोत्सवातंर्गत दि. 13 ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक कलाकारांची सांस्कृतिक मेजवानी, कवीसंमेलन, संस्कृती महाराष्ट्राची, एकांकिका, महाराष्ट्राची लोकगाणी आदींसह कला व मनोरंजनाच्या भरगच्च कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. जालना शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या महोत्सवाचा जिल्हयातील सर्व रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

 

सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महोत्सवातील कार्यक्रमांची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार, दि.13 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते महासंस्कृती महोत्सवाचे उदघाटन होईल. यावेळी राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. यावेळी प्रसिध्द सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा कलाअविष्कार कार्यक्रम होईल. त्यानंतर “गर्जा महाराष्ट्र माझा” हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात गण, गवळण, वासुदेव, वाघ्या मुरळी, कोळी नृत्य, गोंधळ लावणी, धनगर गीत, दिंडी, ठाकर, शेतकरी नृत्य, डोंबारी नृत्य, जोगवा, महाराष्ट्र गीतामध्ये छत्रपती शिवरायांच्या देखाव्यासह प्रसिध्द सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, भार्गवी चिरमुले व स्मिता तांबे सादर करतील. रात्री 9.30 वा. संत साहित्यावर आधारीत मोगरा फुलला हा कार्यक्रम सन्मिता शिंदे व संच सादर करणार आहेत.

 

बुधवार दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता जालना काव्यरंग कार्यक्रमा अंतर्गत डॉ.संजिवनी तडेगावकर, विनोद जैतमहाल, डॉ.एकनाथ शिंदे, कैलास भाले, सुहास पोतदार, मनिष पाटील, नारायण खरात, डॉ.शशिकांत पाटील, गणेश खरात, मंगल धुपे, साहिल पाटील, विनोद काळे, अच्युत मोरे, रेखा गतखने, डॉ.राज रणधीर, दिगंबर दाते, वासुदेव उगले, अशोक खेडकर, राम गायकवाड, श्रीधर कोरडे, कृष्णा आर्दड, दिनेश शेळके, विद्या जाधव, ज्योती आडेकर, दिलीपकुमार सोनवणे आदि स्थानिक कवींची काव्य रसिकांसाठी मेजवानी राहणार असून सुत्रसंचालन डॉ.सुहास सदावर्ते हे करणार आहेत. त्यानंतर जालना नाट्यरंग अंतर्गत “मेजवानी एकांकिका”सादरीकरण होणार असून यात सादरकर्ते सतीश लिंगडे, सुमीत शर्मा व संच हे राहतील. सायंकाळी 06:30 वा. गणेश रंगमंच- मुंबई प्रस्तुत ‘महाराष्ट्राचा लोकमेळा’ कार्यक्रमातंर्गत जालन्याचे भूमीपूत्र डॉ. गणेश चंदनशिवे आणि सहकारी हे कार्यक्रम सादर करणार आहेत.

 

गुरूवार दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5:00 ते 6:30 या वेळेत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रख्‍यात सिनेनाट्य अभिनेता राजकुमार तांगडे व संभाजी तांगडे हे उपस्थित राहतील. यावेळी सेम टु सेम बट डिफ्रंट – एक सांगितीक प्रवास हा कार्यक्रम कैलास वाघमारे, जान्हवी श्रीमानकर सादर करणार आहेत. तर सायं. 6:30 वा. रामानंद कल्याण प्रस्तुत महाराष्ट्राची लोकगाणी हा कार्यक्रम शाहीर रामानंद उगले व शाहीर कल्याण उगले हे सादर करतील.

[12/02, 8:53 pm] Swamiji: शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 ते 6:30 या वेळेत जालना लोकरंग या कार्यक्रमातंर्गत आनंद घुले आणि संच, विलास काटे, उषाताई कावळे आणि संच, शाहिर दिलीप पिंपळे आणि संच, शाहीर प्रकाश कातूरे, सरेश जाधव व संच, शेखर भाकरे व संच हे स्थानिक कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. सायंकाळी 6:30 वा. हास्य रंगांची उधळण: एक सांस्कृतिक ठेवा या कार्यक्रमातंर्गत चला हवा येऊ द्याची टीम कार्यक्रम सादर करणार असून या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून प्रसिध्द अभिनेते सिध्दार्थ झाडबुके हे काम पाहतील.

 

शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 ते 6:30 या वेळेत जालना लोकरंग कार्यक्रमात प्रसिध्द भारुडकार मीरा उमप व संच, संतोष वाघ आणि संच, गजानन लेखणार आणि संच, शाहिर विजय मघाडे, शाहीर अप्पासाहेब उगले, शाहिर नानाभाऊ परिहार व संच, शाहीर मिर कावळे, शाहीर विजय काटे, शाहीर बाबु सेवा राठोड व संच यांचा शाहीरी कार्यक्रम सादर होईल. सायंकाळी 6:30 वा. समारोप कार्यक्रमातंर्गत वंदे मातरम हा राष्ट्रभक्तीपर गीते, भिमगीतांचा, शिवगीतांचा व नृत्यांचा जोशपूर्ण कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध सिनेअभिनेत्री अलका कुबल तसेच सुप्रसिध्द पार्श्वगायिका साधना सरगम, सुप्रसिध्द गायक वैशाली माडे, प्रा. राजेश सरकटे व संच, गायक रवींद्र खोमणे, मुनव्वर अली आणि सुप्रसिध्द कोरिओग्राफर संतोष भांगरे हे राहणार आहेत.

संबंधित पोस्ट

नवीन आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

टीबी निर्देशांकमध्ये जालना जिल्हा ग्रामीण भागातून राज्यात प्रथम क्रमांकावर

vishwatmaklokswamivarta

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतले महत्वपूर्ण निर्णय. –

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-आसामप्रमाणे संपूर्ण देशात ‘बहुपत्नी विवाहा’वर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

vishwatmaklokswamivarta

पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगवान वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.

महाराष्ट्रा मुंबईसह कोकणात पावसाच्या हलक्या सरी; राज्याच्या ‘या’ भागाला यलो अलर्ट…