vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पद भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

          मुंबई, प्रतिनिधी – सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रिये दरम्यान अर्ज सादर करण्याची मुदत दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 11.59 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे. याआधी अर्ज सादर करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत होती.

 

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत “वैद्यकीय अधिकारी गट-अ” पदांच्या एकूण १७२९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ ची १७२९ रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती प्रक्रिया सुरु आहे. आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-२०) या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिराती बघण्यासाठी http://arogya. maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, मुदतवाढीची सूचना संकेतस्थळावरही आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

 

००००

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी करुन आपला ओळख क्रमांक प्राप्त करावा

vishwatmaklokswamivarta

ठाण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाचा रेड अलर्ट जारी…

vishwatmaklokswamivarta

गॅस गळती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे ‘मॉकड्रिल’; रंगीत तालीम संपन्न

vishwatmaklokswamivarta

घाटकोपरच्या झुनझुनवाला कॉलेजमध्ये समर्थन संस्थेच्या वतीने दिव्यांग आणि आर्थिकदृष्टया दुर्बळ युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

एल्डर लाईन – १४५६७; ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण आणि १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण  -माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta