vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लक्षवेधी महारक्तदान शिबिराने जालन्यात शिवरायांना अभिवादन आयोजक सामाजिक कार्यकर्ता शेख इब्राहिम ठरला खरा मावळा..

लक्षवेधी महारक्तदान शिबिराने जालन्यात शिवरायांना अभिवादन आयोजक सामाजिक कार्यकर्ता शेख इब्राहिम ठरला खरा मावळा..

 

राज्य प्रतिनिधी जालना- सामाजिक कार्यकर्ते शेख इब्राहिम यांनी शिवजयंतीनिमित्ताने सोमवारी लक्षवेधी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करून शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा अर्पित केला.

शेख इब्राहिम हे गेल्या 15 वर्षापासून शिवजयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरातील अंबड रोडवरील मंमादेवी नगर परिसरात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक उपक्रम राबवीत आहेत. मराठा क्रांती मोर्चा प्रणित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व शेख इब्राहिम मित्र मंडळाच्या वतीने सोमवारी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

प्रारंभी शिवरायांच्या अर्धकृती पुतळ्यास पुप्षमाला अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. या महा रक्तदान शिबिरात सर्व जाती- धर्माच्या तरूणांनी रक्तदान केले. शेख इब्राहिम यांनी महा रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मराठा सेवा संघाचे आर. आर. खडके, भास्कर अंबेकर, जालना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद,मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील, अक्षय गोरंट्याल आदींनी अभिनंदन करून कौतुक केले. नूर हाॅस्पिटलच्या रक्तपेढीतील डॉ. राहिला शेख, डॉ. बुशरा,खुशमिदा शेख, करामखान,अलिम शेख आदींनी या रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले. शेख महेमूद यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलतांना शेख इब्राहिम म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य स्थापन करून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन राज्य केले होते. विशेष करून त्यांच्या सैन्य दलात मुस्लिम मावळ्यांना जबाबदारीची पदे देउन त्यांच्यावर मोठा विश्वास दाखविला होता. हा महाराजांचा गौरवशाली इतिहास आहे. आज खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचारांची देशाला गरज आहे.

हे महा रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा प्रणित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक पडूळ,मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, मार्गदर्शक जगन्नाथ काकडे, किरण शिरसाट, संतोष कऱ्हाळे, राजे जाधव, संतोष गाजरे, आसिफ पठाण, अर्शद शेख, दत्ता लहाने, मुन्ना पठाण आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

अनधिकृत बालगृहावर महिला व बाल विकास विभागाची कारवाई; ९१ बालकांची सुटका

vishwatmaklokswamivarta

जत येथे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यास मंजुरी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने बुधवार दि. ०९ जुलै ते शुक्रवार दि. ११ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत तीन दिवसात साईंच्या चरणी अर्पण रु.६,३१,३१,३६२/-,सहा कोटी, एकतीस लाख, एकतीस हजार, तिनशे बासष्‍ट मात्र) इतकी देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

एक जिल्हा, एक उत्पादन- 2024’ पुरस्कारात महाराष्ट्राची चमकदार कामगिरी राज्याला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक कृषी आणि गैर कृषी क्षेत्रात रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी..

अनुसूचित जमातीचा सामुहिक विवाह सोहळा आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

कराड येथील ईदगाह मैदानाच्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ – पालकमंत्री शंभूराज देसाई