vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

निधीची कमतरता पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हास्तरीय ‘वारकरी भवन’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

निधीची कमतरता पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हास्तरीय ‘वारकरी भवन’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन…

 

 

राज्य प्रतिनिधी

जळगाव सारख्या संताच्या भूमीत वारकरी भवन होत आहे. अशा या जिल्हास्तरीय वारकरी भवनला निधीची कमतरता पडू देणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

 

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ‘वारकरी भवन‘ चे भूमिपूजन खेडी (जळगाव) येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खा. उन्मेष पाटील, खा रक्षा खडसे, आ. राजुमामा भोळे, आ किशोरआप्पा पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,आज आपल्याला इथे आल्यावर वारकरी संप्रदाय भेटला आणि मनाला खूप आनंद झाला. आज उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या ‘वारकरी भवन‘ चे भूमिपूजन होत आहे. या कामी ज्यांचे ज्यांचे हात लागले त्यांचे आभार आणि ज्यांचे लागणार आहेत सर्वांना या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विकासकामांसोबत अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले आहेत परंतू यात सर्वात महत्वाचे असे ‘वारकरी भवन‘ बांधण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत चांगला असल्याचे सांगून प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन बांधावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

संबंधित पोस्ट

भारतीय संविधान दिनानिमित्त समाज कल्याण कार्यालयामध्ये व्याख्यानाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

गोसेवा आयोग पुरस्कारासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

पारसी टेकडी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करणार          -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,केशवसृष्टी इरकॉन घनवनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

मोतीगव्हाण येथे शेतजमिनीच्या रस्त्याचा वाद विकोपाला न्यायालयाचे जैसे थे ठेवण्याचे आदेश असतानाही उपविभागीय अधिकारी यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिलेच कसे परमेश्वर मोहिते, कारभारी मोहिते यांचा सवाल 

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार– अभिनेते अमीर खान

विमाशि संघाचे मंगळवारी विदर्भस्तरीय धरणे आंदोलनशिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन..