vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मोतीगव्हाण येथे शेतजमिनीच्या रस्त्याचा वाद विकोपाला न्यायालयाचे जैसे थे ठेवण्याचे आदेश असतानाही उपविभागीय अधिकारी यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिलेच कसे परमेश्वर मोहिते, कारभारी मोहिते यांचा सवाल 

मोतीगव्हाण येथे शेतजमिनीच्या रस्त्याचा वाद विकोपाला न्यायालयाचे जैसे थे ठेवण्याचे आदेश असतानाही उपविभागीय अधिकारी यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिलेच कसे परमेश्वर मोहिते, कारभारी मोहिते यांचा सवाल

 

जालना : प्रतिनिधी

तालुक्यातील मोतीगव्हाण येथ्ाील शेतजमिनीच्या रस्त्याचा वाद विकोपाला गेला असून, न्यायालयाचे जैसे थे ठेवण्याचे आदेश असतानाही उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिलेच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी गुरुवारी आलेल्या मंडळ अधिकाऱ्याला जाब विचारत आक्षेप नोंदविण्यात आला. हा वाद विकोपाला जात असल्याने मंडळ अधिकाऱ्याने पंचनामा करुन जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले. तर न्यायालयाच्या निकालानंतर जो िनर्णय येईल, तो मान्य असेल, अशी भूमिका परमेश्वर नारायण मोहिते, कारभारी मोहिते यांनी घेतली आहे.

मोतीगव्हाण येथील गट क्रमांक १६९ मध्ये परमेश्वर नारायण मोहिते, कारभारी मोहिते यांची शेतजमीन आहे. तर गटक्रमांक १६७ मध्ये श्रीमंत कारभारी मोहिते, नामदेव कारभारी मोहिते यांची शेतजमीन आहे. या शेतात जाण्यासाठी रस्ता करावा तो गट क्रमांक १६९ मधील शेतातून, अशी मागणी श्रीमंत कारभारी मोहिते यांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांनी श्रीमंत कारभारी मोहिते यांच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयाची अमलबजावणी करण्यासाठी मंडळ अधिकारी हजारे यांनी गुुरुवारी मोतीगव्हाण येथे भेट दिली. त्यावेळी श्रीमंत कारभारी मोहिते, नामदेव कारभारी मोहिते, राजेंद्र मोहिते यांच्यासह पाच ते सहा जणांनी गांेधळ घालत परमेश्वर नारायण मोहिते, कारभारी मोहिते यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आपण आत्महत्या करु आणि या सर्वांची नावे टाकू, शेतातील गंजीला आग लावून देऊ आणि या सर्वांची नावे तक्रारीत देऊ, असे सांगत हा वाद विकोपाला नेला. परिस्थितीचे गंाभीर्य ओळखत मंडळ अधिकारी हजारे यांनी पंचनामा करत सदर प्रकरण जैसे थे ठेवण्याचा िनर्णय घेतला.

श्रीमंत कारभारी मोहिते यांच्या शेतात जाण्यासाठी गावाच्या दिशेकडून रस्ता असतानाही दुसऱ्या गटातील श्ोतातून रस्ते देणे योग्य आहे का, असा सवाल परमेश्वर नारायण मोहिते यांनी उपस्थित केला आहे. केवळ राजकीय दबावातून आपल्याला त्रास दिला जात असून, न्यायालयाच्या निर्णयावर आपला विश्वास आहे. न्यायालयाचा जो िनर्णय येईल तो आपल्याला मान्य असेल, असे परमेश्वर नारायण मोहिते यांनी सांगितले. गावठाणाच्या जागेतून रस्त्यासाठी जागा देण््यास प्राधान्य दिले गेले पािहजे. परंतु केवळ आपल्याला त्रास देण्याच्या हेतूनेच आपल्या शेतातून रस्ता देण््याचा हट्ट कशासाठी धरला जात आहे, असा आरोप परमेश्वर नारायण मोहिते यांनी केला आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण विषयक जाहीर सुनावणीची सुचना  ..

vishwatmaklokswamivarta

श्री गणेशा आरोग्याचा; उपक्रमात २० हजार जणांची आरोग्य तपासणी..

vishwatmaklokswamivarta

नळगंगा – पैनगंगा नदीजोड प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार नाही- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुख्यमंत्री वॉररुमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला 30 प्रकल्पांचा आढावा ,वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका; तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्पउभारावेत, वॉररुमधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा, बीडीडी चाळ वासियांना लवकरच सदनिकांचे वाटप…

महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर महास्वच्छता अभियान; आमदार-अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर आणि वेरुळ चकाचक-स्वच्छता हीच ईश्वर सेवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी-स्वच्छतेत सातत्य राखणे गरजेचे- आ. प्रशांत बंब

vishwatmaklokswamivarta

बॅटरी संचालित फवारणी यंत्र, कापूस साठवणूक बॅगच्या अर्जासाठी मुदतवाढ