
बॅटरी संचालित फवारणी यंत्र, कापूस साठवणूक बॅगच्या अर्जासाठी मुदतवाढ
बुलडाणा,(जिमाका), : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ योजनेंतर्गत प्रकल्पाचा लाभ घेण्याकरिता दि. 31 ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना अर्ज करताना शेतकऱ्यांना अडचणी आल्याने ते अर्ज करू शकले नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज करावे, अधिक माहितीसाठी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ए.टी. सुरडकर यांनी केले आहे. *******



