
रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीच्या वतीने सुधागडात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
पाली, प्रतिनिधी ः रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी, डिस्ट्रीक्ट 3142 व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागडात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन रविवार 14 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजता. कासारवाडी, नवघर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले आहे. तरी या शिबिरात कासारवाडी, जाधववाडी, नवघर, आसरे, फळसुंडे, धोंडिवली, नवघर बौध्दवाडी, आसरे बौद्धवाडी, उंबरवाडी आदिवासी वाडी गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी, ठाणे व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सन 2000 सालापासून सुधागड तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीच्या माध्यमातून विनामूल्य आरोग्य शिबीर यशस्वीरित्या आयोजित करणारे अध्यक्ष चंद्रशेखर लिमये, सेक्रेटरी अमित देशपांडे, युवा व्यवस्थापक मोहन तेलंग, माजी अध्यक्ष संग्राम जोशी, ठाणे शहरातील नावाजलेले शल्य विशारद व सुधागड भूषण डॉक्टर श्रीपाद बोडस, त्यांच्या पत्नी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अंजली बोडस, आयुर्वेदाचार्य डॉक्टर मोनाली इंगळे, ऑर्थोपेडिक डॉक्टर जयंत गावंड, तसेच बालरोग तज्ज्ञ व अन्य डॉक्टर व रोटरॅक्ट आणि इंट्रॅक्टर्स यांची टीम, व मेडिकल सर्जिकल नर्सेस सोसायटीमधून डॉ. शर्मिला डाके, डॉ. ज्योती पारके, प्रिया शिंदे, बाबा कराळे, प्रिया तळगावकर आदींची टीम आपल्या परिसरातील लहान मुले मुली, तरुण मुले मुली, महिला व पुरुष, ज्येष्ठ महिला, ज्येष्ठ पुरुष यांची आरोग्य तपासणी करून विनामूल्य औषध उपचार करणार आहेत. तसेच या शिबिरासाठी प्रकल्प समन्वयक सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ, ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, समन्वयक बळीराम निंबाळकर
प्रचार व प्रसार कमिटी राजेश बामणे, प्रकाश शिलकर, अजय जाधव, विजय जाधव, राकेश थोरवे, प्रविण बामणे, भगवान तेलंगे दिनेश जाधव तसेच विशेष सहयोग कासारवाडी, जाधववाडी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, सह्याद्री मित्र मंडळ, कासारवाडी, प्राथमिक रा.जि.प. शाळा कासारवाडी आदींचे सहकार्य लाभणार आहे. आपल्या गावातील, परिसरातील गावांनी व सर्व पंचक्रोषीतील रहिवाशांनी वेळेवर उपस्थित राहुन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.



