vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बुलडाणा येथे पशूपक्षीपालन प्रशिक्षण

बुलडाणा येथे पशूपक्षीपालन प्रशिक्षण

 

बुलडाणा, प्रतिनिधी : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे शेळी, कुक्कट, गाय, म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दि. २३ ते २७ एप्रिल २०२४ या पाच दिवसाच्या कालावधीत हे प्रशिक्षण होणार आहे.

 

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा सुशिक्षित बेरोजगारांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा हा आहे. सदर प्रशिक्षणात शेळी, कुकुट, गाय आणि म्हैसपालनाचे तंत्र आणि प्रकार त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग आणि लक्षणे, खाद्य निर्मिती आणि चार्याचे प्रकार, उद्योग सुरु करण्यासाठी संपूर्ण सहकार्य, त्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, सहकार्य, तसेच शासकीय योजनांची माहिती प्रशिक्षणात तंज्ज्ञ व्यक्ती करणार आहेत.

 

प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान पाचवी पास, वय १८ ते ५० वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षण नोंदणीसाठी दि. २३ एप्रिल २०२४ पर्यंत कार्यलयीन वेळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता, संपर्क क्रमांक ८२७५०९३२०१, ९०११५७८८५४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रामाणिक सेवा देणे महत्त्वाचे-पालकमंत्री अब्दुल सत्तार

इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी 15 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ निमित्त रायगड जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २९ ऑक्टोबर रोजी होणार जिल्हास्तर स्पर्धा; युवक-युवतींना सहभागासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

संतांवर जातीयवादी टीका करणार्‍या श्याम मानव यांची जादूटोणा कायद्याच्या समितीतून हकालपट्टी करा ! – हिंदु जनजागृती समितीची शासनाकडे मागणी

vishwatmaklokswamivarta

वैद्यकीय पर्यटन सुरू करावे- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमअन्वये कार्यशाळा उत्साहात

vishwatmaklokswamivarta