
5 जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार मनोज जरांगे पाटील.
राज्य प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांची नंतर पुन्हा मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील पाच जून पासून उपोषणाला बसणार आहेत सरकारला इशारा देण्यासाठी 5 जून पासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींकडे राज्यभरातील जनतेच लक्ष लागलं आहे. 6 जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज विधानसभेची तयारी करेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे
मनोज जरांगे म्हणाले की, “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा. आम्ही यंदा राजकारणात नाही. ना उमेदवार दिलाय, ना कोणाला पाठिंबा दिला. पण, जर 6 जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार. तसेच 5 जूनपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार, अशी घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.



