महामानवाला वंदन करून चर्मकार समाजातील वधू-वर स्नेह परिचय मेळावा
मुंबई प्रतिनिधी:
पंचरत्न महापुरुष संयुक्त विचार मंच तर्फे वधु वर स्नेह परिचय मेळावा 14 एप्रिल 2024 डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त धारावीतील सुप्रसिद्ध राजे छत्रपती शिवाजी विद्यालय खुला प्रांगणात येथे सकाळी नऊ ते तीन वेळेत घेण्यात आला होता. मेळाव्यात अपेक्षा पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला.
याप्रसंगी महामानवांना व पुष्प माला अर्पण करून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामुदायिक वंदन करण्यात आले. यावेळी माजी आमदार बाबुराव माने यांनी सर्वांचे स्वागत करून कक्कया (ढोर) व रोहिदास-हराळे (चांभार) या चर्मकार समाजाचे एकत्रीकरण ही काळाची गरज ओळखून पंचरत्न मंचातर्फे उचललेले पाऊल समाज परिवर्तनाच्या दिशा देते अशी कौतुकाची थाप आयोजकांना देऊन उपस्थित असलेले नव तरुणांचे परिवर्तन शिकले पाहिजे जाती-जातीतील भिंती व बेड्या तोडल्या पाहिजे असे आवाहन माने यांनी केले. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमात मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील तीनशे लोकांनी सहभाग नोंदविला या
कार्यक्रमाची प्रास्ताविका व समाजाप्रती आपली असलेली भूमिका संजय शिंदे यांनी मांडली त्यानंतर दिलीप गाडेकर यांनी उपस्थित समूहाचे स्वागत करून कार्यक्रमाचे नियोजन सर्वांसमोर मांडले ढोर -कक्कया व हराळे-चांभार या दोन्ही समाजातील वधू-वरांचा विवाह सोहळ्याची अडचणी पालकांनी मोठ्या मनाने स्वीकाराव्यात असे मत व्यक्त केले त्यानंतर वयोगटानुसार वधू-वरा समोर समोर बसून स्नेह परिचयासाठी संधी दिली गेली. कार्यक्रमाच्या शेवटी गिरीराज शेरखाने यांनी ज्या ज्या घटकांनी मदत व सहकार्य केले त्यांचे आभार मानले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी साबळे नंदकिशोर नारायणे, महेंद्र व्हटकर, चंद्रकांत जाधव, सचिन चौगुले, दुर्गा जाधव, संध्या डोईफोडे, मंगेश खरटमल यांनी सहकार्य केले कार्यक्रमासाठी गणेश खाडे, दौलत लवंगारे, सचिन चौगुले यांनी पाणी, चहा स्नॅक्स, आणि सुखा खाऊ वस्तूची मदत केली.
चतुर गायधनकर, नामदेव आबनावे, छाया ढवळे, फुलपाती गौतम, शंकर गोपी डे यांनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचरत्न मंचाचे दिलीप गाडेकर यांनी केले.