vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मतदान करणारच… इतरांनाही सांगणार; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा वकील संघटने कडून जनजागृती*

मतदान करणारच… इतरांनाही सांगणार; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा वकील संघटने कडून जनजागृती*

 

ठाणे, प्रतिनिधी – लोकसभेच्या ठाणे मतदारसंघात मतदारसंघात ७५ टक्केपेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी 25 ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. याच उद्देश्याने ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून ठाणे जिल्हा कोर्ट येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

 

ठाणे जिल्हा कोर्ट परिसरात मतदान जनजागृती होर्डिंग्ज लावण्यात आले होते. ‘चुनाव का पर्व, देश का गौरव’ या टॅग लाईनखाली मी मतदान करणारच… इतरांनाही सांगणार, ‘आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा’ असा संदेश स्वीप टीमने सर्व वकिलांना दिला.

वकिलांनी आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला व येणाऱ्या अशिलाना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन उपस्थित वकिलांना स्वीप पथकाच्या वतीने करण्यात आले.

 

मतदान जनजागृती कार्यक्रम १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या नियोजनाखाली आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

 

Regards,

संबंधित पोस्ट

धक्कादायक! चोरीच्या हेतूने गळा चिरुन रेल्वे ट्रॅकवर फेकलं, डोंबिवली पुन्हा हादरली

समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला पुढे नेऊन भारत आज जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये केले.

vishwatmaklokswamivarta

सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुलुंड (पूर्व) येथे उभारण्यात आलेल्या कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता- ‘टेक वारी’तील ज्ञानाचा नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी घेत आहेत ऑनलाईन लाभ

मराठवाड्यातील युवक-युवतींसाठी 23 व 24 फेब्रुवारीला लातूर येथे विभागीय भव्य नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर ऑनलाईन नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ कार्यान्वित 

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकारातून कळवा येथे भव्य सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न