vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

निवडणूक प्रक्रियेला आजपासून होणार सुरुवात प्रशासनाची सज्जता; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

निवडणूक प्रक्रियेला आजपासून होणार सुरुवात प्रशासनाची सज्जता; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १९- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया दि.१८ पासून सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने अधिसुचना प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान ही सर्व प्रक्रिया नामनिर्देशनाने सुरु होणार असून त्यासाठी प्रशासनाने सर्व सज्जता केली असून सर्व पूर्वतयारीचा अंतिम आढावा आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज घेतला.

 

जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी स्वामी यांच्या सह उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मिटर परिसरातील सुरक्षा नियमांच्या अनुषंगाने बदल करावयाचे वाहतुक मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या येण्या जाण्याबाबतचे मार्ग, वाहनांचे पार्किंग, उमेदवारी अर्ज दाखल करावयास येणाऱ्या उमेदवारांसाठी असणारे नियम इ. बाबत सुरक्षा यंत्रणांकडून आढावा घेण्यात आला. येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, आवश्यकतेनुसार दिशादर्शक फलक इ. तयारीचा आढावा घेण्यात आला. नामनिर्देशन दाखल करणे, त्यांची छाननी, उमेदवारी अर्ज माघारी घेणे अशा महत्त्वाच्या टप्प्यांवर आवश्यक असणारा पोलिस बंदोबस्त व आयोगाच्या सुरक्षा निर्देशांची तपासणी करण्यात आली.

 

वाहतुक मार्गात बदल

 

१९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया गुरुवार दि.१८ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने दि.१८ (उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिनांकापासून) ते दि.२९ पर्यंत (उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिनांकापर्यंत) वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालय परिसरातील वाहतुक वळविण्यात आली आहे. दि.१८ ते दि.२९ दरम्यान दररोज सकाळी ९ ते सायं.६ दरम्यान या परिसरातील वाहतुक सर्व वाहनांसाठी बंद करुन अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

 

बंद वाहतुक मार्ग-

 

चांदणे चौक- जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त यांच्या निवासस्थानाजवळील टी- पॉईंट पर्यंत.

 

पर्यायी मार्ग-

 

१) चांदणे चौक- अण्णाभाऊ साठे च्चौक- उद्धवराव पाटील चौक- सत्यविष्णू हॉस्पिटल चौक- एन १२ गणपती विसर्जन विहीर मार्गे येतील व जातील.

 

२) चांदणे चौक- फाजलपुरा- चेलीपुरा चौक- चंपा चौक- विभागीय आयुक्त निवासस्थानासमोरील दर्गा मार्गे येतील व जातील.

 

पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावशयक सेवेच्या वाहनांना हा वाहतुक बदल लागू असणार नाही असे शहर वाहतुक शाखा -१ चे पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांनी कळविले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी उरलेत शेवटचे तीन दिवस* *सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करावी* -जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

पंढरपूर मंदिर समितीतील भ्रष्टाचाराची ‘एस्आयटी’मार्फत चौकशी करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी..* श्री विठ्ठलाच्या प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन आणि त्यांच्या नोंदी न करणे, हा मोठा घोटाळाच !

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेंतर्गत रुजू झालेले प्रशिक्षणार्थांची माहिती सादर करण्याचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

शिर्डी साईबाबा चे दर्शन ला दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या मर्सडीज कारला अचानक आग.सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर घटना.

महाकवी कालिदास नाट्यगृह येथे रक्षाबंधन उत्सवास मुख्यमंत्री यांची उपस्थिती;बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संविधान, धर्मनिरपेक्षता आणि कायदा तोपर्यंतच राहील जोपर्यंत हिंदूंची संख्या जास्त असेल. हिंदू जर अल्पसंख्यांक झाले तर काहीच राहणार नाही. उपमुख्यमंत्री नितीन पटेल.