vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विधी स्वयंसेवक नेमणूकीसाठी अर्ज करावेत

विधी स्वयंसेवक नेमणूकीसाठी अर्ज करावेत

 

 

 

जालना, प्रतिनिधी) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना व त्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या तालुका विधी सेवा समिती अंबड, परतूर, भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, मंठा व घनसावंगी येथे विधी स्वयंसेवकांची नेमणूक करणे आहे. विधी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

विधी स्वयंसेवक पदासाठी उमेदवार हा निवृत्त शिक्षक, एम.एस.डब्ल्यू विद्यार्थी व शिक्षक, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी / कायद्याचे विद्यार्थी (जोपर्यंत ते वकील म्हणून नावनोंदणी करीत नाहीत तोपर्यंत), बिगर राजकीय सेवाकेंद्रित, बिगर शासकीय स्वयंसेवी संस्था व क्लबचे सदस्य, महिला गट/मैत्री संघ आणि दुर्लक्षित / दुबळ्या गटांसहित इतर स्वयंसहायता गटातील सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीला विधी स्वयंसेवक म्हणून योग्य वाटेल अशी कोणतीही व्यक्ती अशा गटापैकी पात्र व्यक्ती, विद्यार्थी, महिलांनी आपला अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना व तालुका स्तरावरील तालुका विधी सेवा समिती येथे कार्यालयास प्रत्यक्ष भेट देवून दि.30 एप्रिल 2024 रोजी पर्यंत देण्यात यावा.

 

कार्यालयाचा संपर्क पत्ता – जिल्हा न्यायालय परिसर, अंबड चौफुली, जालना फोन नं.: ०२४८२-२२३६२५ मो.नं. ८५९१९०३६२, तालुका स्तरावरील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालय, अंबड, परतूर, भोकरदन, जाफ्राबाद, बदनापुर, मंठा व घनसावंगी असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभाग ची माहिती…वाळवा तालुक्यात 3.9 मि. मी. पावसाची नोंद

स्व. हर्षवर्धन आगाशे जिल्हास्तरीय लोकगीत समूहगान करंडक स्पर्धेचे आयोजन

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्यांसाठीच्या योजना सुलभतेने पोहचाव्यात यावर भर – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कोराडी महालक्ष्मी ते अयोध्या तिर्थदर्शन यात्रेस प्रारंभ

सर्वंकष धोरणाअंतर्गत बार्टी मार्फत यूपीएससी, एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू

जिल्ह्यातील ३०३ जणांना समारंभपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान,सरकारी नोकरी म्हणजे जनतेच्या सेवेची संधी- पालकमंत्री संजय शिरसाट