vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र दिन पूर्व तयारी बैठक कोकण भवनात आढावा

महाराष्ट्र दिन पूर्व तयारी बैठक कोकण भवनात आढावा

 

 

 

नवी मुंबई, प्रतिनिधी: 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाच्या महसूल शाखेचे उपायुक्त विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता लागू असलेल्या आचारसंहितेमुळे यंदा महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण साध्यापध्दतीने होणार असल्याची माहिती उपायुक्त विवेक गायकवाड यांनी दिली.

 

कोकण भवनातील पहिला मजला समिती सभागृह येथे झालेल्या या बैठकीत उपआयुक्त सामान्य अमोल यादव, उपआयुक्त विकास गिरीष भालेराव, तसेच कोकण विभागातील विविध कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

 

वातावरणातील बदल आणि वाढते तापमान लक्षात घेता यंदा महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय स्तरावरील मुख्य ध्वजारोहण दि. 1 मे, 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता करण्यात यावे असे शासनाचे निर्देश आहेत. मुख्य शासकीय ध्वजारोहण कळंबोली सेक्टर-17 येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार असून. त्या अनुषंगाने बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. गायकवाड यांनी कोकण भवनातील सर्व शासकीय यंत्रणांनी हा सोहळा लोकसभा निवडणूकीमुळे लावण्यात आलेल्या आचारसंहितेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन यशस्वीरित्या व उत्साहात साजरा करण्याबाबत सूचना दिल्या. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी आणि हा कार्यक्रम उत्साहात साजरा करावा, असे सांगून सर्वांनी शासकीय पोशाखात कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

 

000000000

 

.वृ.क्र.46

संबंधित पोस्ट

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024विधानसभा मतदारसंघासाठी मतदान यंत्राची पहिली पुरवणी सरमिसळ

vishwatmaklokswamivarta

गोवंश हत्येच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हावी, अनधिकृत कत्तलखाने बुलडोझर लाऊन उखडून टाकावे व पूर्ण बंद करण्यात यावे – पोलिस प्रशासनाला निवेदन

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा-राज्य आरोग्य हमी सोसायटीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

माजी राज्यमंत्री अर्जुन रावजी खोतकर यांच्या प्रचारार्थ आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांची लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत सभा पार

vishwatmaklokswamivarta

मुंबईत माटुंगा येथील रेशनिंग कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे लागली आग, अग्निशामक दलाने आग विझवून आटोक्यात आणली

vishwatmaklokswamivarta