vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हिंदु जनजागृती समितीची शिक्षण विभागाकडे मागणी आतंकवादाचे समर्थन करूनही मुख्याध्यापकपदाचे त्यागपत्र न देणार्‍या परवीन शेख यांची हकालपट्टी करा !

हिंदु जनजागृती समितीची शिक्षण विभागाकडे मागणी आतंकवादाचे समर्थन करूनही मुख्याध्यापकपदाचे त्यागपत्र न देणार्‍या परवीन शेख यांची हकालपट्टी करा !

 

राज्य प्रतिनिधी

      मुंबई – हमाससारख्या क्रूर आतंकवादी संघटनेचे समर्थन करूनही त्याविषयी अपराधीपणाची भावना न बाळगता, उलट स्वत:च्या देशद्रोही कृतीचे समर्थन करणार्‍या सोमय्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांची पदावरून त्वरित हकालपट्टी करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्यशासनाकडे केली आहे. याविषयी ६ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंत्रालयामध्ये जाऊन शिक्षण विभागाच्या सचिवांकडे कारवाईची मागणी केली आहे. या वेळी अधिवक्ता अनिश परळकर, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक, राष्ट्रप्रेमी नागरिक सर्वश्री विलास निकम, श्संदीप तुळसकर, वेणुगोपाळ बल्ला हे उपस्थित होते. आतंकवाद्यांचे समर्थन करूनही शाळा व्यवस्थापनाने त्यागपत्र देण्याची मागणी केल्यावर परवीन शेख यांनी मी भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात रहात असून मला बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. शाळा व्यवस्थापन त्यांना त्यागपत्र देण्यासाठी दबाव टाकत आहे, असा बनाव केला. हा गंभीर प्रकार हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे शिक्षण विभागाच्या लक्षात आणून दिला.

 

आतंकवाद्यांची बाजू घेणार्‍या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करणार ?

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कारण पुढे करून परवीन शेख यांनी आतंकवाद्यांची बाजू घेतली आहे. आतंकवाद्यांची बाजू घेणार्‍या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करणार ? असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीने या निवेदनातून उपस्थित केला आहे.

आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करा ! – गृहविभागाकडे मागणी

परवीन शेखसारख्या भारतातील सुशिक्षित मुसलमान महिला आतंकवाद्याला उघडपणे सहानुभूती दाखवतात हे गंभीर आहे. अशा प्रकारे सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे किंवा अन्य माध्यमांद्वारे कुणी आतंकवाद्यांचे समर्थन करत असेल, तर त्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने गृहविभागाकडे केली आहे.श्री. सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,हिंदु जनजागृती समिती,

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि अध्यक्ष शरद पवार 1 ऑगस्टला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सत्काराच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार….

नोएडा मधील अनधिकृत ट्विन टॉवर सुरक्षा मानकांचं पालन करत आज पाडण्यात आला आहे. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं. अपेक्स (32 मजली) आणि सियान टॉवर्स (29 मजली)

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान का-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – फडणवीस संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकर

vishwatmaklokswamivarta

महिला अत्याचार प्रश्नावर महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची राज्यपालांची सूचना योग्य – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta

रेशीम, रेशीम उत्पादन, हातमाग आणि तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवीन संधी खुल्या करण्यासाठी भारतीय प्रतिनिधिमंडळाची व्हिएतनामला भेट

vishwatmaklokswamivarta

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत