
कोंकण भवनात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त अभिवादन
नवी मुंबई, प्रतिनिधी- ज्येष्ठ समाज परिवर्तवादी युगपुरुष एक महान तत्वज्ञानी आणि लिंगायत धर्म स्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोंकण भवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वर हे 12 वे शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक व राजकीय समाज परिवर्तनवादी होते. महात्मा बसवेश्वरांनी चातुर्वणाला विरोध केला. वर्णभेद ,जातीभेद नुसतेच नाकाराले नाही तर त्यावर त्यांनी सडकून टिका केली. महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील गरिबी विषमता दूर करून आर्थिक समृध्दता निर्माण करण्यासाठी समाजाला ‘काय कवे कैलास’ आणि ‘दासोह’ अशा दोन क्रांतीकारक संकल्पना दिल्या. बसवेश्वरांच्या उपदेशामुळे वेगवेगळया व्यवसायांना विशेषत: ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळाले आणि सर्व व्यवसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला.



