vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेश

सोन्याचे दागिने फसवणूकप्रकरणी चौघांना अटक

दागिने फसवणूकप्रकरणी चौघांना अटक…

 

गुन्हे प्रतिनिधी

आदमापूर (ता. भुदरगड) येथील दोन महिलांना सोन्याचे दागिने डबल करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांना गंडा घातल्याप्रकरणी भुदरगड पोलिसांनी चौघांना अटक केली. केराबाई सुभाष महेकर (वय ४९), सुभाष महेकर (६०), सुशांत सुभाष महेकर (२९, रा. पालकरवाडी, ता. राधानगरी), रूपेश सुरेश साठे (३७, रा. शिंगणापूर, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, आदमापूर येथील दोन महिलांना तब्बल १५ तोळे सोन्याच्या दागिने डबल करून देण्याचे आमिष दाखवून अंदाजे सव्वासात लाख रुपयांच्या दागिन्यांना गंडा घातला होता. आदमापूर येथे १५ एप्रिल २०२४ ला हा प्रकार घडला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वैशाली संदीप पाटील यांनी याबाबतची फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांनी केराबाई महेकर, सुभाष महेकर, सुशांत महेकर, रूपेश सुरेश काटे या चौघांना अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता केराबाई महेकर, सुभाष महेकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली; तर सुशांत सुभाष महेकर व रूपेश सुरेश काटे यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक जीवन पाटील अधिक तपास करीत आहेत.

संबंधित पोस्ट

अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती निमित्त पाहेगावात विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद” – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचे मार्गदर्शन” 

जालना शहरात भाजपच्या नवीन शाखेचे उदघाटन कार्यकर्त्यांना एकत्र आणणे हेच संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे – मा.आ.कैलासजी गोरंटयाल,भाजपच्या नव्या शाखेने शहरातील पक्ष कार्य बळकट होईल – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामांतर*

शेलूद येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची 31 वी सभा संपन्न

vishwatmaklokswamivarta

नागपुरातील आरएसएसचे मुख्यालय उडवण्याची फोनद्वारे बॉम्बची धमकी, नागपूर पोलिस सतर्क

vishwatmaklokswamivarta

जालन्यातील रस्त्याच्या दुभाजकमधील झाडेझुडपे छाटून साफसफाई करावी इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाचे मनपा प्रशासनाकडे निवेदन सादर

vishwatmaklokswamivarta