vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालन्यातील रस्त्याच्या दुभाजकमधील झाडेझुडपे छाटून साफसफाई करावी इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाचे मनपा प्रशासनाकडे निवेदन सादर

जालन्यातील रस्त्याच्या दुभाजकमधील झाडेझुडपे छाटून साफसफाई करावी इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाचे मनपा प्रशासनाकडे निवेदन सादर

जालना/प्रतिनिधी-जालना शहरातील सर्वच रस्त्याच्या दुभाजकमधील झाडेझुडपे छाटून साफसफाई करावी, जेणे करून, रस्त्यावर अपघात होणार नाही, या मागणीचे निवेदन इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह नितीन गायकवाड, अखिलेश काबलिये यांच्या शिष्टमंडळाने जालना शहर मनपा प्रशासनाकडे दिले आहे.

यासंदर्भात मनपाचे अति. आयुक्त अर्जुन गिराम यांनादिलेल्या निवेदनात म्हटले की, जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल समोरील रोडवरील रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकामध्ये झाडेझुडपे वाढली आहे. तसेच शहराबाहेर अंबड चौफुली, मंठा चौफुली, नाव्हा चौफुली, भोकरदन नाका येथेही दुभाजकामध्ये मोठमोठी झाडी-झुडपे वाढली आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत असून, यामुळे मोठा अपघात व दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

शहरात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहे. या कामासोबतच रस्त्याच्या दुभाजकमधील छोटी-छोटी झाडेझुडपे काढून घेण्यात यावे, व दुभाजकाला संरक्षण लोखंडी जाळी बसवून त्यामध्ये वृक्षारोपण करावे अशी मागणी केली आहे.

संबंधित पोस्ट

पाणीपुरवठा विषयक जाहीर आवाहन*

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही ; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी..

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट : डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील लोकाभिमुख प्रशासनाचा नवा अध्याय

गडचिरोलीत कबड्डीचा थरार! वीर बाबुराव शेडमाके स्पर्धेत ‘जय सेवा कबड्डी संघ, सोडे’चा विजय..

vishwatmaklokswamivarta

टाकाऊ वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्रातून कापडी कच-याच्या समस्येचे निराकरण तसेच महिलांचे सक्षमीकरण…

शेगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर