जालना शहरात भाजपच्या नवीन शाखेचे उदघाटन कार्यकर्त्यांना एकत्र आणणे हेच संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे – मा.आ.कैलासजी गोरंटयाल,भाजपच्या नव्या शाखेने शहरातील पक्ष कार्य बळकट होईल – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे
जालना शहरात भाजपच्या नवीन शाखेचे उदघाटन कार्यकर्त्यांना एकत्र आणणे हेच संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे – मा.आ.कैलासजी गोरंटयाल,भाजपच्या नव्या शाखेने शहरातील पक्ष कार्य बळकट होईल – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे
जालना, (प्रतिनिधी) – जालना शहरातील प्रभाग क्र. १ संभाजीनगर परिसरातील पासी चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या नवीन शाखेचे उदघाटन आज (दि.३०) रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या शाखेच्या स्थापनेमुळे स्थानिक पातळीवरील संघटन अधिक बळकट होणार असून कार्यकर्त्यांना एकत्र येऊन पक्षविचारांवर काम करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या शाखेचे उदघाटन मा.आ. कैलासजी गोरंट्याल, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शाखा उदघाटन सोहळ्याचे आयोजन श्री.राजेश देसार यांनी केले केले.
यावेळी मा.आ.कैलासजी गोरंटयाल म्हणाले की, स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांना एकत्र आणणे हेच संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. भाजपच्या प्रत्येक शाखा आणि प्रभागातील कार्यकर्त्यांचे सहकार्य व उत्साह यांवरच आमच्या संघटनेचे यश अवलंबून आहे. नव्या शाखेच्या स्थापनेमुळे कार्यकर्त्यांना एकत्र येऊन पक्षविचारांवर काम करण्याची संधी मिळेल आणि स्थानिक पातळीवरील संघटना अधिक बळकट होईल.
यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे म्हणाले की, शहरात भाजपच्या नव्या शाखेच्या स्थापनेमुळे शहरातील पक्ष कार्य अधिक बळकट होईल. प्रत्येक प्रभागात मजबूत संघटना असणे हे विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना नव्या व्यासपीठावर एकत्र आणून, सकारात्मक विचार व मेहनत यावर आधारित कार्यक्रम राबविणे हे आमच्या उद्देशाचे मुख्य साधन आहे.
यावेळी प्रदेश निमंत्रित सदस्य राजेशजी राऊत, रामेश्वर पाटील भांदरगे, भाजपा युवा नेते अक्षय भैया गोरंट्याल, नवीन जालना मंडळाध्यक्ष सुनील खरे, उपाध्यक्ष धनराज काबलीये, सिद्धिविनायक मुळे, सरचिटणीस सुनील पवार, नगरसवेक सुनील राठी, जीवन सले, अर्जुन राऊत तसेच प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्यास उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.
यामध्ये उपाध्यक्ष अनिल नवमहालकर, सचिव शेखर पवार, सह सचिव सागर घुगे, सल्लागार विकास नखलव, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम सोसे, सह कोषाध्यक्ष कृष्णा नखलव, सदस्य शरद पवार, सदस्य कृष्णा नखलव, सदस्य अमित पवार, सदस्य कृष्ण देसार, सदस्य मंथन देसार, सदस्य विनोद हरदेकर, सदस्य विलास पवार, सदस्य दिनेश भदनेकर, सदस्य उमेश भदनेकर, सदस्य अभिजित चौधरी, सदस्य धनराज नखलव, सदस्य राजा ढाकणे, सदस्य मुकेश नवमहालकर, सदस्य ब्रिजेश ढोलके, सदस्य राजाराम हरिभाऊ शिंदे, सदस्य दिपक मोहिते, सदस्य मयूर पवार आदींची उपस्थिती