
मेट्रो डेपो हलवण्याचे काम सुरू आम आदमी पार्टी मुंबई प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रणाली गिरीश राऊत यांनी मानले प्रशासनाचे आभार..
मुंबई प्रतिनिधी
माहीम पश्चिम येथील भागोजी कीर मार्गावरील एडवोकेट. देसाई मैदानात गेली आठ वर्षे मेट्रो ३ भूयारी रेल्वेच्या शीतलादेवी स्थानकाचे गोदाम (डेपो) आहे. इतका काळ हे क्रिडांगण खेळासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे बालके, तरूण व ज्येष्ठ नागरिकांंचे न भरून येणारे नुकसान झाले आहे व आजही होत आहे. याबाबत एम एम आर सी एल कडे दि. १७ नोव्हेंबर २०२३ रोजी पत्र दिले होते.
मधील काळात मैदान मोकळे होईल अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. मी माहीममधील रहिवाशांची स्वाक्षरी मोहीम घेतली आणि दि. ३० एप्रिल २०२४ रोजी नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह पत्र मेट्रो कडे दिले. नंतर मेट्रोचे नियोजन अधिकारी आर रमणा यांची भेट घेतली. मैदान खेळासाठी उपलब्ध नसल्याने मुले व तरूणांच्या ऊर्जेला विधायक पध्दतीने वाट मिळत नाही, त्याचा परिणाम म्हणून तरूणांमधे व्यसनांचे प्रमाण वाढत आहे व इतर समस्या तयार होत आहेत. विभागातील शाळांच्या क्रीडा स्पर्धा या मैदानात होत असत. त्या आता होत नाहीत. वाहतुकीच्या प्रकल्पाचा असा समाजिक दुष्परिणाम होत आहे याकडे मी, रमणा यांचे लक्ष वेधले.
सीतलादेवी स्थानकाचे काम पूर्ण होण्यावर मैदान उपलब्ध होणे अवलंबून ठेवू नये, नागरिकांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी डेपो लवकरात लवकर इतर ठिकाणी हलवावा, अशी मागणी केली. श्री. रमणा यांनी ही गोष्ट लक्षपूर्वक समजुन घेतली. त्यांनी मैदानातील डेपो हलवुन जून २०२४ पर्यंत मैदान पूर्ववत मातीच्या स्वरूपात उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आहे.
आज पर्यंत या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष दिले नव्हते. मात्र प्रशासनाला स्वाक्षऱ्यांसह लेखी निवेदन दिल्यानंतर मेट्रो डेपो हलवण्याचे काम सुरू झाले आहे. आम आदमी पार्टी मुंबई प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रणाली गिरीश राऊत यांनी याबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत.



