vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

24-कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रशिक्षण संपन्न निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

24-कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रशिक्षण संपन्न

निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

 

 

ठाणे, प्रतिनिधी – 24-कल्याण लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदान प्रक्रियेची मतमोजणी दि. 04 जून 2024 रोजी डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज मतमोजणी प्रक्रियेसंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले.

 

कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया डोंबिवली येथील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात होणार आहे. या मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण आज सावित्रीबाई फुले कला मंदिरात घेण्यात आले. मतमोजणी केंद्रातील प्रवेशाचे स्थान यापासून मतमोजणी केंद्राची रचना, मतमोजणी टेबलांची रचना, पोस्टल बॅलेटची मतमोजणी व इतर मतमोजणी प्रक्रियेबाबत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी अत्यंत ओघवत्या व सुलभ शब्दात तसेच सादरीकरण व प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देवून मार्गदर्शन केले.

 

मतमोजणीच्या दिवशी सकाळी 07.00 वाजता सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी मतमोजणी केंद्रात स्थानापन्न व्हावे, तसेच मतमोजणी केंद्रात मोबाईल बाळगण्यास सक्त मनाई आहे, अशा सूचनाही श्रीमती सातपुते यांनी यावेळी दिल्या.

 

यावेळी 24-कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदनिर्देशित अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते आणि सहाही विधानसभा मतदारसंघाचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

 

000000000

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सचा केला सत्कार महाराष्ट्र एनसीसी देशात सर्वोत्कृष्ट: राज्यपालांकडून कॅडेट्स ना कौतुकाची थाप..

vishwatmaklokswamivarta

शिवसैनिकांच्या स्वभावात आक्रमकता, त्यांना छेडले तर ते तुम्हाला सोडणार नाही, शिवसेना नेते संजय राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य….

साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कृषिमंत्र्यांच्या हस्ते द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या ,कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा नियोजन विभागाची राज्यस्तरीय बैठक दूरदृष्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न जिल्ह्यात जास्तीत जास्त लोकाभिमुख, लोकोपयोगी अन्,नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

vishwatmaklokswamivarta