vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज,मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज,मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई..

 

राज्य प्रतिनिधी

ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रानिहाय प्रत्येकी १४ टेबल

टपाली मतपत्रीकांच्या मोजणीसाठीही १४ टेबल : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी ४ जून रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे होणार आहे. यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

 

या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

 

मा. भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून जी.एस प्रियदर्शी (आय.ए.एस.) व राम प्रकाश (एस.सी.एस.) तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून राजीव रंजन (आय.ए.एस) व नवाब दीन (एस.सी.एस.)यांची नियुक्ती केली आहे.

 

मतदान केंद्रावरील आवश्यक त्या सोयीसुविधा आणि उपाययोजना बाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांचा सातत्याने आढावा सुरू आहे.

 

मतमोजणी केंद्रावर मतदान यंत्रातील (ईव्हीएम) प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

संबंधित पोस्ट

स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त खास , शेअर करुन महाराजांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

जम्मू काश्‍मीरमधील घातपातामागे ‘फाल्कन स्क्वॉड….

नवनीत राणा आणि रवी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

गणपती बाप्पा मोरया ,हेलिकॉप्टरद्वारा अष्टविनायक दर्शन सेवा सुरू; इथे पहा कुठे कराल बुकिंग

vishwatmaklokswamivarta

आळंदी (पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वारकरी कीर्तनकार कार्यशाळा उत्साहात पार पडली !कीर्तनकारांनी सांप्रदायिक कार्याच्या समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे ! – ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीसाठी कार्यशाळा उपयुक्त  –जिल्हाधिकारी किशन जावळे