
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना
राज्य प्रतिनिधी : जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये बारावीनंतरच्या मान्यताप्राप्त जिल्हास्तरावरील तंत्रशिक्षण, तसेच व्यवसाय शिक्षण घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार सलंग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यात येते.
या योजनेच्या लाभासाठी मुलभूत पात्रता ही विद्यार्थ्यी धनगर समाजातील असावा, विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारण राहील. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने स्वत:चे आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.
शैक्षणिक निकषात इयत्ता बारावीमध्ये 60 टक्के गुण असणे आवश्यक. दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा मिळणार नाही. बारावीनंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण, तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला असावा. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यास अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
तसेच एका विद्यार्थ्यास जास्तीस जास्त 5 वर्षे योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी व्यवसाय करत नसावा. विद्यार्थ्यांस आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांने विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या महाडीबीटी अर्ज केला आहे व त्याचा अर्ज मंजूर झाला आहे, त्यांना अनुज्ञेय राहील. वसतिगृह प्रवेश प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.
संबंधित विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थेने अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. त्याच प्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने संबंधित सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहिल. त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील.
अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.
00000



