vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशव्यवसाय

दिंडी मार्गावरील ढाबे, हॉटेल्समधील अन्न नमुन्यांची तपासणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

दिंडी मार्गावरील ढाबे, हॉटेल्समधील अन्न नमुन्यांची तपासणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

     छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी)- आषाढी निमित्त जिल्ह्यातून पंढरपूर कडे जाणाऱ्या दिंड्यांच्या मार्गावरील सर्व ढाबे, हॉटेल्समधील अन्न नमुन्यांची तपासणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 

जिल्हास्तरीय सुरक्षित अन्न व आरोग्यदायी आहार सल्लागार समितीची बैठक आज पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, सहाय्यक आयुक्त अन्न अजित मैत्रे, दयानंद पाटील तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

 

बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात अन्न औषध प्रशासन विभागामार्फत केलेल्या कारवाईत ३३७ अन्न नमुने घेण्यात आले. त्यापैकी २४४ नमुने प्रमाणित होते तर २६ नमुने कमी दर्जाचे होते.९ नमुने मित्थ्या छाप व ६ असुरक्षित होते. ५२ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ४७० परवानाधारक व १५८ नोंदणी धारक आहेत. त्यापैकी सुधारणा नोटीस ३२५ जणांना देण्यात आल्या. ८ जणांचे परवाना निलंबन करण्यात आले तर ३ लाख ४३ हजार रुपयांचा दंड ४२ जणांकडून वसुल करण्यात आला. ३२ ठिकाणी २० हजार ३०० किलो अन्न पदार्थ जप्त करण्यात आले. त्यांची किंमत २९ लाख ८२ हजार ६७५ रुपये इतकी आहे,असेही सांगण्यात आले. प्रतिबंधित अन्न पदार्थ संदर्भात ४८ ठिकाणी कारवाई करुन ८० लाख ८२ हजार ४८५ रुपये किंमतीचे अन्न पदार्थ जप्त करण्यात आले. याच प्रकरणात आठ वाहनेही जप्त करण्यात आले असून ३७ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ३४ आस्थापनांना सिल करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.

 

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, अन्न औषध प्रशासन विभागाने नियमित कारवाया करतांना स्वयंप्रेरणेने विशेष मोहिमा राबवाव्या. सद्यस्थितीत पावसाळ्याच्या अनुषंगाने लोकांना अन्नबाधा होऊ नये, या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाई करावी. जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्यांच्या मार्गावरील हॉटेल्स, ढाबे येथील अन्न नमुने तपासावे असे निर्देशही त्यांनी दिले. पुढे उपवासांच्या कालावधीत भगर सेवनातून अन्नबाधा होऊ नये यासाठी नमुने तपासावे, लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी लोकांना सुरक्षित व निर्भेळ अन्न मिळावे याची खबरदारी घ्यावी,असेही त्यांनी सांगितले.

 

०००००

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण

शिर्डी येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’चे उद्घाटन सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट – हरिभाऊ बागडे

vishwatmaklokswamivarta

मायक्रोसॉफ्ट कंपनीने 559 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले…  

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पोलादपूर, महाड व माणगाव तालुक्यातील माजी सैनिक, विधवा,अवलंबित डिफेन्स पेंशन धारकांसाठी भेट दौऱ्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta