vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे आवाहन उद्योजकांनी दंड व्याजाची रक्कम माफ करुन घेवून कर्जाची परतफेड करावी

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे आवाहन उद्योजकांनी दंड व्याजाची रक्कम माफ करुन घेवून कर्जाची परतफेड करावी

 

 

 

जालना, प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय जालना यांच्यामार्फत सन 1962 ते 1995 या कालावधीत मंडळामार्फत नॉर्मल व सीबीसी कर्ज ग्रामीण उद्योजकांना वाटप करण्यात आले होते. तसेच सन 1995 ते 2001 पर्यंत कन्सोर्टींय बँक फायनान्स या योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले. परंतू परतफेड केलेली नाही अशा उद्योजकांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून दंडव्याजाची रक्कम माफ करुन घेवून केवळ कर्जाची परतफेड करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय जालना यांच्यामार्फत विविध योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले होते. परंतू उद्योजकांची आर्थिक स्थिती व आधूनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे उद्योग जागतिक स्पर्धेत टिकू शकले नाही. परिणामी उद्योजकांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांच्याकडून कर्ज वसूली वेळेत पुर्ण होवू शकली नाही तसेच काही उद्योजक मयत, परागंदा अन्य कारणामुळे स्थलांतरीत झाल्याने कर्ज वसूली थकीत झालेली आहे. जिल्हा कार्यालयाकडून वारंवार कर्ज वसूलीच्या नोटीस पाठवून कर्ज भरणा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. परंतू अर्थसहाय्यांच्या योजनांना 50 वर्षा इतक्या दिर्घ कालावधी पुर्वीच्या आहेत. त्यांची एकरक्कमी वसूली होण्यासाठी मंडळाद्वारे थकीत मुद्दल व सरळव्याज, मार्जिन मनी एकरक्कमी भरणा केल्यास दंडव्याज माफ करण्यात येणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

 

वृत्त क्र.3324

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या मध्ये पक्षप्रवेश; बाबा सिद्दिकी यांचे पुत्र जीशान सिद्दिकी विधानसभेसाठी वांद्रे पूर्व मधून वरूण सरदेसाई विरूद्ध उमेदवारी जाहीर…

vishwatmaklokswamivarta

विकास कामांना प्राधान्य देऊन कामे गतीने पूर्ण करा ,पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच- भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण…

केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांचे उमेदवार स्नेहा सिद्धार्थ कसारे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन धुवाधार प्रचार सुरू विरोधकांची हवा उडाली…

vishwatmaklokswamivarta

दहावीच्या विद्यार्थ्याने गिरवले प्रशासकीय कामकाजाचे धडे; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून “डे विथ कलेक्टर” उपक्रम प्रसादच्या जिज्ञासू वृत्तीचे व या उपक्रमाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले कौतुक

vishwatmaklokswamivarta

ठाणे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शहर कार्यालयात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta