vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेशस्थानिक बातम्या

खेळाडूंनी माहिती सादर करण्याचे आवाहन

खेळाडूंनी माहिती सादर करण्याचे आवाहन

 

बु‌लडाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, आशियाई स्पर्धा, ऑलिंपिक, कॉमनवेल्थ गेम्स किंवा त्याखालील जागतिक आशियाई स्पर्धांमध्ये खेळणारे खेळाडूंची माहिती संकलीत करण्यात येणार आहे. यासाठी खेळाडूंनी माहिती सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीयस्तरावर खेळणारे खेळाडू, आशियाई स्पर्धा, ऑलिंपिक, कॉमनवेल्थ गेम्स किंवा त्याखालील जागतिक आशियाई स्पर्धा असतील अशा खेळाडूंवर लक्ष केंद्रीत करणे, आर्थिक मदत मिळण्याकरीता क्रीडा संचालनालयामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे.

 

अद्यावत सुरु असलेले ट्रेनिंग, खेळाडूंची अद्यापपर्यंतची क्रीडा कामगिरी, पदके, उच्चांक गाठली असतील, त्याबाबतची माहिती संकलीत करण्याचे काम, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. शासनामार्फत पात्र खेळाडूंना विविध योजनांचा लाभ द्यायचा असल्यास त्यासाठी ते पात्र असतील, त्यांचे प्रस्ताव तयार करून संचालनालयाकडे पाठवणे गरजेचे आहे. तसेच वयोवृद्ध खेळाडूंना मानधन, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना रोख बक्षिसे, आर्थिक सहाय्य या प्रचलित योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. काही खेळाडू परदेशात असल्यास त्यांचे प्रशिक्षक व्यवस्थापक, कुटुंबीय यांची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात असणे आवश्यक आहे. संबंधीत खेळाडूंचा शासनामार्फत सत्कार, अडचणी असल्यास विचारपूस करणे आदीची माहिती कार्यालयामार्फत संकलीत करण्यात येत आहे.

 

जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीयस्तरावरील खेळाडू, आशियाई स्पर्धा, ऑलिंपिक, कॉमनवेल्थ गेम्स किंवा त्याखालील जागतिक आशियाई स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनी तसेच त्यांचे प्रशिक्षक अथवा पालकांनी माहिती कार्यालयास द्यावी, तसेच अधिक माहितीकरीता जिल्हा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

सफाई कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात- आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशाेत्सव साजरा करा – पालकमंत्री संजय शिरसाट गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समन्वय समितीची बैठक

तानसा धरण लवकरच भरुन वाहण्याची शक्यता; प्रशासन सजगआजूबाजूच्या गाव, वाड्या, पाड्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन

एआय’च्या वापरामुळे नवउद्योगाला उज्ज्वल भविष्य-भारतीय उद्योजकतेचे भवितव्य चर्चासत्रातील सूर

कल्याण व भिवंडीतील मागासवर्गीय मुलांमुलींचे शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू…

जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी सरकारी महाविद्यालयाच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल; तक्रारदाराने केले गंभीर आरोप