vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईतील अरबी समुद्र मध्ये शिवस्मारक कधी होणार याच्या मागणी महायुती सरकारला स्मरण करण्यासाठी भव्य जागरण गोंधळ उद्या आझाद मैदानात होणार..

 मुंबईतील अरबी समुद्र मध्ये शिवस्मारक कधी होणार याच्या मागणी महायुती सरकारला स्मरण करण्यासाठी भव्य जागरण गोंधळ उद्या आझाद मैदानात होणार..

 

[

मुंबई प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील शिवस्मारक कधी होणार? याच्यासाठी शिवसेना भाजपाच्या महायुती सरकारला स्मरण करून देण्यासाठी आझाद मैदान येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रम उद्या दिनांक 24/7/24 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सीएसटी समोर असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या आजाद मैदानात दुपारी एक वाजल्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जय शिवसंग्राम या पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष शशिकांत गणपती शिरसेकर यांनी सांगितले आहे

[याबाबत सविस्तर वृत्त असे की शिवसेना भाजपा सरकारच्या काळामध्ये मुंबईतील गिरगाव चौपाटी जवळ असलेल्या अरबी समुद्रामध्ये अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य जागतिक दर्जाचे असे शिवस्मारक बांधण्यात येणार आहे अशी घोषणा युतीच्या काळात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी साहेबांनी जलपूजन यांच्या हस्ते करण्यात आली होते. परंतु अजूनही इतकी वर्ष झाली तरी सदर शिवस्मारक आज पर्यंत तरी अरबी समुद्रात बांधण्याची तयारी करण्यात आलेली नाही याचे काय कारण आहे असा सवाल मुंबई प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिरसेकर जय शिवसंग्राम यांनी केलेली आहे परंतु महायुती सरकार सोबत असल्याकारणाने आम्ही शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीच्या या सरकारला शिवस्मारक अरबी समुद्रात कधी होणार ? याचे स्मरण करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सीएसटी मुंबई महानगरपालिकेसमोर आझाद मैदानात भव्य दिव्य असा जागरण गोंधळ घालून सरकारला स्मरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे प्रदेश अध्यक्ष आणि सर्व शिवप्रेमी शिवभक्त आणि समाजाला आवाहन केले आहे की त्यांनी सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने हजर होऊन कार्यक्रम यशस्वी करावा आणि लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील शिवस्मारक लवकरच पूर्ण होईल अशी आम्ही आशा करतो

संबंधित पोस्ट

44-सांगली लोकसभा मतदारसंघात 20 उमेदवार निवडणूक रिंगणात

महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून विदर्भासह कोकणाला विशेष सुचना

रेड लाईट भागात पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स महिलांनी तोडले…

महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अधिक सक्षम करणार    – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

खंडणी प्रकरणात चौकशी सुरू :वाझे-परमबीर सिंग यांच्या भेटीवर गृहमंत्री वळसेंचा मोठा निर्णय….

vishwatmaklokswamivarta

पवईमध्ये रिपब्लिकन पक्षाचा ईशान्य मुंबई जिल्ह्याचा मेळावा* *केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार

vishwatmaklokswamivarta