vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सर्व पेट्रोल पंपानी सुरक्षतेचा अहवाल सादर करावा-जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने

सर्व पेट्रोल पंपानी सुरक्षतेचा अहवाल सादर करावा-जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने

 

सातारा प्रतिनिधी : हिंदुस्थान पेट्रालियम कार्पोरेशन लि., इंडियन ऑईल कार्पोरेशन लि., भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. या सर्व कंपनीचे सेल्स ऑफीसर यांना सातारा जिल्हयातील सर्व पेट्रोल पंपाचे भूमिगत टाकीची तात्काळ तपासणी करून त्यामध्ये पावसाचे पाणी जात नसलेबाबत खातरजमा व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व बाबींची तपासणी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केल्या

 

इथेनॉल मिश्रित पेट्रोल विक्रीच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने सातारा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सेल्स ऑफिसर हिंदुस्थान पेट्रालियम कार्पोरेशन लि. शिखर श्रीवास्तव , सेल्स ऑफिसर इंडियन ऑईल कार्पोरेशन लि. मयंक अग्रवाल, सेल्स ऑफिसर भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. सुभाष गुप्ता, विपुल शहा, रितेश रावखंडे, प्रदिप सांगावकर, रमेश हलगेकर, प्रकाश पारेख, केदार नाईक यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य हे उपस्थित होते.

सर्व पेट्रोलपंप चालक यांनी सुरक्षेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी याबाबत सर्व सेल्स ऑफीसर यांनी पेट्रोलपंप चालक यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असे सांगून जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने म्हणाल्या, सद्यस्थितीत इथेनॉल मिश्रित पेट्रोल असल्याने ह्याचा सर्व्हिसिंग करताना, गाडी धूताना किंवा इतर काही कारणास्तव पाण्याशी संपर्क आला तर यामधील इथेनॉल हे पेट्रोल पासून विभक्त होते व ते पाण्यासह गाडीच्या टाकीशी तळाशी साचते व गाडी स्टार्ट करताना किंवा चालवताना त्रास होवू शकतो. प्रत्येक वाहनधारकांनीही वाहनाच्या टाकीतील पेट्रोलचा पाण्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच याबाबतचे माहीतीचे फलक प्रत्येक पेट्रोल पंपावर लावावेत.

इथेनॉल मिश्रीत पेट्रोलची साठवणूक व हाताळणूक यासाठी आवश्यक मानकानुसार सर्व पेट्रोल पंपावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून घेण्यात याव्यात जेणेकरून वाहनांच्या इंधन क्षमतेवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी सेल्स ऑफीसर, हिंदुस्थान पेट्रालियम कार्पोरेशन लि, इंडियन ऑईल कार्पोरेशन लि., भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांनी घ्यावी, असे निर्देशही जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने यांनी दिले.

पावसाळयात इथेनॉल मिश्रीत पेट्रोलमध्ये पाणी गेल्याने वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी होऊन पंपचालक व वाहनधारक यांचेमध्ये वाद होत आहेत. अशा परिस्थितीत कंपन्याकडून आवश्यक ती खबरदारी घेणेत यावी अशी मागणी सातारा जिल्हा पेट्रोल डिझेल असोशियनच्यावतीने बैठकीत करण्यात आली.

0000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा..!

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 नोव्हेंबर 2025 रोजी करणार उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळासाठीउद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविणार – कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

vishwatmaklokswamivarta

परेल येथील केईएम रुग्णालयात दलित विद्यार्थी रॅगिंगप्रकरणी मूक निदर्शने…..

vishwatmaklokswamivarta

मुंबईत बीइएसटी बेस्टच्या तिकीट दरात दुप्पट वाढ; ८ मेपासून नवे दर लागू