
क्रीडा स्पर्धेबाबत आज ऑनलाईन प्रशिक्षण
बुलडाणा, : जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, क्रीडा मार्गदर्शकांना क्रीडा स्पर्धेबाबत शुक्रवार, दि. दि. 26 जुलै 2024 रोजी ऑनलॉनईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे तालुका ते राष्ट्रीयस्तरापर्यंत विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. या क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक, तसेच एकविध खेळ संघटनांच्या सहकार्याने पार पाडत येतात. सन 2024-25 या सत्रात क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाकरीता ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रवेश अर्ज स्वीकारुन आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने सदर ऑनलाईन सॉफ्टवेअर हाताळणीसाठी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, तसेच दुपारी 2 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगाव राजा, बुलडाणा तालुक्यांचे प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे घेण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणाकरीता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक आणि ऑनलाईन काम करणारे संगणक चालक, तसेच जिल्ह्यातील एकविध खेळांच्या क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.
00000



