vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आपल्या मुली गायब होतात, फ्रीज, कपाटात सापडतात; यशश्रीला न्याय द्या… अभिनेत्री केतकी चितळे

 आपल्या मुली गायब होतात, फ्रीज, कपाटात सापडतात; यशश्रीला न्याय द्या… अभिनेत्री केतकी चितळे

बॉलीवूड प्रतिनिधी

वर्षीय तरुणीवर वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं नवी मुंबई हादरली आहे. यशश्री शिंदे असं या तरुणीचं नाव होतं. तिला न्याय मिळावा यासाठी नागरिक रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. तर सोशल मीडियावरही या घटनेचा संताप व्यक्त करण्यात येतोय. आता अभिनेत्री केतकी चितळे हिनं हेखील या प्रकरणावर भाष्य केलंय. यशश्रीला न्याय मिळालाच पाहिजे, असं म्हणत तिनं लव्ह जिहाद हा मुद्दाही मांडला आहे.

 

केतकी अनेकदा सामाजिक मुद्द्यावर व्यक्त होताना दिसते. आता केतकीनं यशश्री शिंदे प्रकरणावर व्हिडिओ शेअर केला असून संताप व्यक्त केलाय.

 

काय म्हटलंय केतकीनं तिच्या व्हिडिओमध्ये?

 

लव्ह जिहाद फक्त बिहारमध्ये होतोय, हे खोटं आहे.

लव्ह जिहाद फक्त केरळमध्ये होतोय, हे खोटं आहे.

लव्ह जिहाद फक्त पश्चिम बंगालमध्ये होतोय, हे खोटं आहे.

लव्ह जिहाद फक्त मुस्लिमांचा प्रभाव असेलल्या राज्यात होतोय हे खोटं आहे.

लव्ह जिहादचं प्रमाण फक्त ग्रामीण भागात आहे, हे खोटं आहे.

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिला लव्ह जिहादला बळी पडताय, हे खोटं आहे.

जिथं जिथं हिंदू आहेत तिथं तिथं लव्ह जिहाद आहे.

 

आपल्या मुली गायब होतायत. कधी फ्रीजमध्ये सापडतात, कधी कपाटात ,तर कधी समुद्रात. नाही तर सुटकेसमध्ये. पूर्वी लोक स्वातंत्र्यासाठी लढले. आपल्याला आता धर्मासाठी लढायचं आहे.

 

पोलिस आपल्या बाजूने नाहीत. प्रशासन आपल्या बाजूनं नाही. आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे.

 

हा व्हिडिओ शेअर करताना केतकीनं #justiceforyashshreeshinde हा हॅशटॅग वापरला आहे.

 

काय आहे नेमकं प्रकरण?

 

रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या तरुणीचा मृतदेह उरण स्थानकालगतच्या झुडपात आढळून आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

 

या घटनेतील मृत तरुणी २५ जुलैला दुपारी दीडच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती मैत्रीणीच्या घरी गेली. तेथून ती पनवेल स्थानकाच्या दिशेनं गेली होती. त्यानंतर सांयकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तिचा मोबाइल बंद झाला. याचदरम्यान तरुणीवर अज्ञातानं वार करून तिची हत्या करून पलायन केलं होतं.

 

दरम्यान, तरुणीच्या हत्या प्रकरणात ज्या दाऊद शेखवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानं काही वर्षांपूर्वी यशश्रीची छेडछाड केली होती. त्यामुळं त्याच्याविरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्या अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हा आरोपी फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

संबंधित पोस्ट

पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

vishwatmaklokswamivarta

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’ उपक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या जावयाच्या भावावर फसवणुकीचा गुन्हा दाखल बनावट सही शिक्क्याचा वापर करुन फसवणूक केल्याचा आरोप, पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta

पुण्याच्या मनपा क्षेत्रातील विनापरवाना अनधिकृत बांधकामे रोखणार- मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

स्वामी गोविंददेव गिरिजी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ‘सनातन आश्रमा’त हृद्य भेट !भारताला जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचवण्यात ‘सनातन आश्रमा’चे योगदान सर्वांत मोठे असेल ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी

vishwatmaklokswamivarta