vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकस्थानिक बातम्या

दूरदर्शनचा प्रेक्षकांच्या भेटीला मालिकांचा अनमोल नजराणा…

दूरदर्शनचा प्रेक्षकांच्या भेटीला मालिकांचा अनमोल नजराणा…

सुरेश गायकवाड

सांस्कृतिक प्रतिनिधी मुंबई- प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून त्यांना उच्च दर्जाची आणि आकर्षक आशय असलेली मालिकांचा अनमोल नजराणा दूरदर्शन सहयाद्री आणि डी.डी. नॅशनल या राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित होणार असल्याचे या वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख संदीप सूद यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

   ह्या पत्रकार परिषदेत ‘ आमची अनन्या’ ही डीडी सहयाद्री वाहिनीवर प्रसारित होणारी मालिक आहे. त्या मालिकामध्ये तीन पिढ्या गुण्यागोविंदाने कशा राहता आहेत. एकमेकांशी आनंदाने, प्रेमाने कसे राहता आहेत याचा सुंदर मिलाप सदर मालिकेत सादर केला आहे. ह्या मालिकेची संकल्पना आणि दिगदर्शन अश्विनी गड्डू यांचे पटकथा हरेश पटेल यांचे असून लेखक राजेश कोळंबकर यांनी केले आहे. या मालिकेत प्रमुख भूमिकेत इरचित्रवाणी व चित्रपटातील कलाकार इरावती लागू , नंदू गाडगीळ, संजीवनी भिसे, असून सहाय्यक भूमिकांमध्ये सचिन वाळुंजे, दीपा आमरे, प्रगती भोसले, आलाप त्यागी, वनिता निकम, विनय कांबळे, राजेश साळवी आदी कलाकार आहेत. अनन्याच्या मुख्य भूमिकेत पृथ्वी काळे असून शिर्षक गीत रागिणी कवठेकर यांनी गायले असून संगीत सोहम मर्चंट यांचा आहे. ही मालिका ९ ऑगस्ट २०२४ रोजी शुक्रवार ते रविवार ( आठवड्यातून तीन दिवस ) सायंकाळी ७.३० वा. असून डीडी सहयाद्री मराठी वाहिनीवर जवळपास 30 मिनिटांचा एक भाग असा सादर होणार आहे.

   विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे कलाकार पृथ्वी काळे, इरावती लागू, नंदू गाडगीळ आदी मान्यवर परिषदेला उपस्थित होते.

   याशिवाय आमचे हे… आमची ही, ही डीडी सह्याद्री वाहिनीवरची दुसरी मालिका प्रसारित करीत असताना अत्यंत नावाजलेल्या नामवंतांचा, गुणवंतांचा गप्पा गोष्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात त्यांच्या गप्पा गोष्टीतून विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर करणार असून निरंजन पाठक निर्माते आहेत. मनोरंजन, क्रीडा,आणि व्यवसाय यासह विविध क्षेत्रातील प्रसिद्ध जोडप्यांचे जीवन, नातेसंबंध आणि यश कार्यक्रमातून जाणून घेता येईल. त्यांचा वैयक्तिक प्रवास यशोगाथा आणि अनुभवा तुन प्रेरणा आणि नवी अंतदृष्टी लाभेल असा हा सेलिब्रिटी जोड- यांचा नात्यांचा उत्सव अनुभवास मिळेल.

   एवढेच नव्हे तर वाचू आनंदे- हा डीडी सहयाद्री वाहिनीवर प्रसारित होणारा आणि मराठी साहित्याचा समृद्ध वारसा साजरा करणारा अनोखा चर्चात्मक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात मान्यवर लेखक आणि सुप्रसिद्ध व्यक्ती गाजलेल्या साहित्यकृतिमधील उताऱ्यांचे वाचन करतील. धनश्री दामले सूत्र संचालन करतील तर उत्तारा मोने यांनी संशोधन केलेल्या या कार्यक्रमात पुल देशंपाडे आणि विजय तेंडूलकर यांच्यासारख्या ख्यातनाम लेखकांच्या पुस्तकांतील काही भाग सुप्रसिद्ध कालाकाराकडून वाचून सादर केला केला जाईल.थोडक्यात मराठी साहित्य सागरात खोल सूर मारून गुंगवून टाकणाऱ्या चर्चा आणि सादरीकरणे यांच्या माध्यमातून त्यांचे खास सौंदर्ये अनुभवण्यार्ची संधी हा कार्यकम प्रेक्षकांना देईन.

   सरतेशेवटी डीडी नॅशनल प्रसारित होणारा हम तो मिडल क्लास है जी हो आनंददायी विनोदी मालिका असून त्यात आपल्या देशातील मध्यमवर्गीय कुटुंबातील रोजच्या जगण्यातील आनंद आणि संघर्ष यांचे दर्शन घडते. झाशीहून मुंबईला स्थलांतरीत झालेल्या कुटुंबाला मुंबईतील आयुष्याशी जुळवून घेताना काय करावे लागते ते या मालिकेत पाहता येईल. प्रेमळ कौटुंबिक मूल्यांना विनोदांची जोड देऊन हा कार्यक्रम देशभरातील प्रेक्षकांना त्यातील पात्रांशी जोडून घेतो व मनोरजनांचा उत्तम अनुभव देतो.

   आमचे हे … आमची ही ही मालिका १४ ऑगस्ट २०२४ रोजी दर बुधवारी सायं .८.३० वाजता तर वाचू आनंदे … ही मालिका १२ ऑगस्ट २०२४ रोजी रात्रो८.३० वा. ३० मिनिटांचा कार्यक्रम डीडी सहयाद्री मराठी सोमवार आणि मंगळवार आठवड्यातून दोनदा प्रसारित करण्यात येणार आहे. आणि १ जुलै २०२४ रोजी डीडी नॅशनल हिंदी 30 मिनिटांचा कार्यक्रम सोमवार ते गुरुवार आठवड्यातून चार वेळा दाखविण्यात आला आहे.

    अशा घ्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रम प्रसारित होताना ८ आणि ९ ऑगस्ट २०२४ रोजी ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांचा गोष्टी गाण्यांचा कार्यक्रमात सहभागी होणार असून या कार्यक्रमांचा ९० आणि ९१ वा भाग प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाशी संबंधित वामन केंद्रे, सावनी रविंद्र अनूज कपूर आदी सारख्या मान्यवरांचा सहभाग असणार असल्याचे ही त्यांनी सांगून जागो ग्राहक ही गाजलेली मालिका आणि ज्येष्ठ लेखिका आणि चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या वरील माहितीपटाची २८ भागाची मालिका या कार्यक्रमाची आठवण करून दिली.

संबंधित पोस्ट

संतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर दर्गा ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा (353) उरुस साजरा

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक –  पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले…

मुंबईतील कोळीवाड्यांचा विकासासाठी सीमांकन प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवारी फेरफार अदालत

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद विभागातील पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठी मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी करावी

राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे. ‘महाप्रीत’च्या माध्यमातून राज्यात होणाऱ्या विविध प्रकल्पांची कामे जलद आणि दर्जेदार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

vishwatmaklokswamivarta