vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने तातडीने कृती करावी .. हिंदू राष्ट्र समन्वय समिती

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने तातडीने कृती करावी .. हिंदू राष्ट्र समन्वय समिती

 

राज्य प्रतिनिधी:

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने तातडीने कृती करावी !, अशी आग्रही मागणी मुंबईतील दादर पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळ   ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने आयोजित ‘हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलना’त करण्यात आली.

मुंबई – बांगलादेशात आरक्षणाच्या सूत्रावरून सरकारविरोधी आंदोलनात झालेल्या हिंसाचारामुळे तेथे अराजक माजले आहे. या सरकारविरोधी आंदोलनात जिहादी आणि कट्टरतावादी जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करत आहेत. हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंची घरे आणि दुकानांवर आक्रमणे करून ते लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होत आहे आणि तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण अजूनही आहे. बांगलादेशमधील हिंदूंची विदारक स्थिती पाहता हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशातील समाजकंटकांवर भारत सरकारने कारवाई करावी

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या आंदोलनात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मानव सेवा प्रतिष्ठान, वज्र दल, योग वेदांत समिति, सुयश मित्र मंडळ, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. या वेळी शासनाला देण्यात येणार्‍या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकर यावेळी म्हणाले, ‘बांगलादेशातील आंदोलन हिंदूविरोधी झाले आहे. भारत सरकारने बांगलादेशाच्या विरोधात तत्परतेने कारवाई करावी. भारताने बांगलादेशमध्ये सैन्य घुसवून बांगलादेशातील हिंदूबहुल भाग भारताला जोडावा.’ ‘बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलो नाही, तर भारतातील हिंदूंचेही भवितव्य धोक्यात आहे, असे सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री अभय वर्तक यावेळी म्हणाले. तर मानवाधिकार कार्यकर्ते श्री. महेश वासू म्हणाले, ‘बांगलादेशातील स्थिती हिंदूंची अत्यंत भयावह आहे. भारतातील हिंदूंपर्यंत हा अत्याचार पोचवायला हवा.हिंदूंच्या नरसंहाराविषयी बांगलादेशी प्रसारमाध्यमे गप्प आहेत.’

 

बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या बांगलादेशमध्ये स्थापन झालेले अंतरिम सरकार आणि सैन्य दल यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले, घरांची लूट, मंदिरांवरील हल्ले, मूर्तींची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, हिंदूंना तातडीने सुरक्षा पुरवून आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित वा मालमत्ता यांची जी हानी झाली असेल, त्याची तातडीने भरपाई करावी आदी मागण्या पूर्ण होण्यासाठी भारत सरकराने सध्याच्या बांगलादेशमधील अंतरिम सरकारवर दबाव आणावा असे या आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी आवाहन केले.

 

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्‍या अत्‍याचारांच्‍या विरोधात बांगलादेश, संयुक्‍त राष्‍ट्रांचे मुख्‍यालय यांसह जगातील विविध ठिकाणी आंदोलने होऊ लागली आहेत. हिंदूंच्या नरसंहाराचे गांभीर्य लक्षात घेता भारत सरकारनेही हा विषय तातडीने ‘संयुक्त राष्ट्र संघा’त मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी. बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदु विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील, त्यांना ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’द्वारे (सीएए) भारत सरकारने आश्रय द्यावा. आदी मागण्याही भारत सरकारकडे या हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलनात केल्या आहेत.

संबंधित पोस्ट

पाच वर्षांनंतरही शासनाचा आदेश बासनात; दारू दुकाने व ‘बार’ला देवता-राष्ट्रपुरुषांची नावे !श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्याऐवजी शासकीय अधिकार्‍यांकडून बार मालकांची पाठराखण; अधिकार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

अमिताभ बच्चन, रणवीर सिंह, अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्यावर गुन्हा दाखल; पान मसाला जाहिरातीमुळे वाढल्या अडचणी

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सेलू, जिंतूर येथे नैसर्गिक आपत्तीचा घेतला आढावा नुकसानीचे जलदगतीने पंचनामे करण्याचे निर्देश; रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा सुरळीत करावा, आपत्ती टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण सोडत सुव्यवस्थित रितीने संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेची दोन पथके पूरग्रस्त रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना.

आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आषाढी वारी साठी होणार प्रस्थान