vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जात पडताळणी समितीचे दोन दिवस त्रुटी पुर्तता शिबीर”

जात पडताळणी समितीचे दोन दिवस त्रुटी पुर्तता शिबीर”

 

सातारा प्रतिनिधी:मराठा जात प्रमाणपत्राच्या आधारे ‘सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग’ (SEBC) या प्रवर्गातून व्यावसायिक प्रवर्गातून प्रवेश घेणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदत दिलेली आहे. तरी माहे जुन २०२४ पासुन आजअखेर ज्या मागासवर्गीय विद्यार्थी / अर्जदारांनी समितीकडे जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे परंतु अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, अथवा ज्या अर्जदारांचे प्रकरण त्रुटीयुक्त आहे अशा (SEBC) मराठा व्यतिरिक्त इतर सर्व विद्यार्थी / अर्जदारांनी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा या कार्यालयात दि. २८ व २९ ऑगस्ट २०२४ दरम्यान सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहुन आपल्या प्रकरणी त्रुटीपुर्तता करावी, असे आवाहन श्रीमती स्वाती इथापे, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांनी केले आहे.

 

सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिर्वाय आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यतः तीन महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते.

 

माहे जुलै २०२४ या महिन्यामध्ये समितीकडे जवळपास ४६०० प्रस्ताव सादर झाले आहेत. माहे जुलै २०२४ महिनाअखेर व दि. २५ ऑगस्ट २०२४ अखेर एकुण मिळुन २६०० परिपुर्ण प्रस्तावांची छाननी करून प्रकरणी वैधता प्रमाणपत्र निर्गमित केलेली आहेत.

संबंधित पोस्ट

धनुष्यबाण कोणाचा? शिवसेना निवडणूक चिन्हावर आयोग आजच घेणार निर्णय?

पोलीस भरती मैदानी चाचणी दरम्यान उमेदवार माजी सैनिकाचा मैदानावरच मृत्यू; मुंबई येथील घटना

उद्या ओडिशा, पश्चिम बंगाल,सितरंग’ वादळामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत ह्रदय शस्ञक्रियेसाठी 29 बालके मुंबईला रवाना..

मकर संक्रांतीच्या अगोदर व नंतर काही दिवस पतंग उडविण्याचे प्रमाण,नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कार्यवाही…

vishwatmaklokswamivarta

बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार – उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कृषिक २०२५’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta