vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नागरिकांसाठी कायदेविषयक साक्षरता शिबीरमिळणार विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ

नागरिकांसाठी कायदेविषयक साक्षरता शिबीरमिळणार विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ

 

 

ठाणे, प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे व तालुका विधी सेवा समिती, बेलापूर आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.01 सप्टेंबर 2024 रोजी, सकाळी 10 वा., राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, नवी मुंबई म.न.पा. शाळा क्र.55, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, रबाळे एमआयडीसी, नवी मुंबई येथे नागरिकांकरिता कायदेविषयक साक्षरता शिबिराद्वारे विधी सेवा व सहाय्य तसेच शासन स्तरावरील विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ देण्याकरिता एकाच छताखाली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.श्रीनिवास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

नागरिकांसाठी शासनाद्वारे वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना कार्यान्वित केल्या जातात, परंतू सर्वच नागरिकांपर्यंत या योजना पोहोचतात असे दिसून येत नाही. त्यासाठीच या महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महाशिबिरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, कामगार आयुक्तालय, तसेच सामाजिक क्षेत्रात विविध स्तरावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सहभाग घेणार आहेत.

 

या शिबिरात सर्व शासकीय विभागांमध्ये नागरिकांकरीता असलेल्या सर्व योजनांसाठी स्वतंत्र स्टॉल व तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येणार असून सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे व त्या योजनांचा लाभ मिळवून देणे, हा महाशिबिराचा उद्देश असून महाशिबिरासाठी सर्व नागरिकांना मोफत प्रवेश आहे.

 

तरी या सूवर्णसंधीचा लाभ घेण्याकरिता सर्व स्तरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सामील होण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे चे सचिव श्री.ईश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

महागाई विरोधात डाव्या पक्ष्यांनी पुकारले देशव्यापी आंदोलन…

मकरंद रानडे राज्‍य माहिती आयुक्‍त पदावर रुजू

शिल्पबाजारात हस्तशिल्पाचे प्रदर्शन व विक्री स्टॉल

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून लघु उद्योगासाठी अर्थसहाय..

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा संवर्धनासाठी दैनंदिन जीवनात प्राधान्याने मराठीचाच वापर करावा – अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार

vishwatmaklokswamivarta

अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन