vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

ग्रामीण भागात व्यापारी संघटना मजबूत करणार – आदेशपालसिंग छाबडा,मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सची नूतन संचालक मंडळाची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

ग्रामीण भागात व्यापारी संघटना मजबूत करणार – आदेशपालसिंग छाबडा,मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सची नूतन संचालक मंडळाची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या नूतन संचालक मंडळाची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे १ सप्टेंबर रोजी रविवारी चेंबरचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका व गाव पातळीपर्यंत व्यापारी संघटना मजबूत करण्यास प्राधान्य देण्याचे सर्व संमतीने ठराव पारित करण्यात आला.

सरकार दरबारी व्यापाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करायचे असल्यास व्यापारी संघटना ग्रामीण, तालुका स्तरावर मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठवाडा चेंबरचे संचालक मंडळ प्रयत्न करणार आहे. तसेच व्यवसाय कर रद्द करण्यासंबंधी सरकार दरबारी चेंबरकडून अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. तरी अद्याप सरकारने हा कर रद्द केलेला नाही. सरकारने हा कर रद्द केला नाही तर पुढील काळात व्यापारी वर्गाचा तीव्र आंदोलन उभारण्याचा िनर्धार बैठकीत करण्यात आला. मराठवाड्यातील काही महानगरपालिका २४ तास जनतेस पाणी पुरवठा करत नाही. तरीही पूर्ण पाणीपट्टी वसूल करत आहे. याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. त्याविषयी महानगरपालिकेच्या आयुक्तांना जाब विचारण्याची तयारी चेंबरने केली आहे. या बैठकीस महासचिव शामसुंदर लोया , कोषाध्यक्ष विकास सावजी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत राठी, सूर्यकांत हाके, संजय मोदानी, सचिव संतोष कावळे पाटील, जफर मिर्झा, सहसचिव संजय दाड आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील’कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास महादेवी पुन्हा नांदणीत येण्याची शक्यता..

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा विविध खेळांच्या माध्यमातून युवकांनी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ; वन क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करावा- सभापती प्रा.राम शिंदे• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम आणिविद्यापीठ इमारत १५ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या बैठकीत सूचना..

सातार्‍याची 30 वर्षीय गिर्यारोहक ठरली कांचनगंगा शिखर पादाक्रांत करणारी पहिली भारतीय महिला

vishwatmaklokswamivarta

ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई

यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य..